कोकणात घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण | म्हाडाने काढली 4,654 घरांची महा-लॉटरी; हि आहे याची शेवट तारीख...
Mhada Lottery Konkan 2023 | महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ४६५४ सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर होत आहे. सर्वसामान्य नागरिकांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता शासन कटिबद्ध आहे. राज्यातील परवडणाऱ्या गृहनिर्मितीला वेग देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असतानाच कोकण मंडळातर्फे इतक्या मोठ्या प्रमाणात सदनिकांची सोडत ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे.
Mhada Lottery Konkan 2023 साठी अर्ज करण्यास इथे क्लिक करा.
उत्कृष्ट जीवनशैली, शिक्षण-रोजगाराच्या उत्तम संधी या सर्व बाबींमुळे मुंबई शहरात स्थायिक होण्याचे स्वप्न पाहणान्या नागरिकांना मुंबईमध्ये घरांचा तुटवडा प्रकर्षाने जाणवत असल्याने, शेजारील ठाणे व नवी मुंबई भागात मोठ्या प्रमाणात घरांची मागणी निर्माण होत आहे. कोकण मंडळातर्फे ठाणे, विरार-बोळींज व नवी मुंबई येथील विविध गृहप्रकल्पांतर्गत अत्यल्प उत्पन्न गट, अल्प उत्पन्न गट, मध्यम व उच्च उत्पन्न गटासाठी सुमारे ४६५४ सदनिका अत्यंत परवडणान्या दरात सोडत प्रक्रियेद्वारे उपलब्ध होणार आहेत. अधिकाधिक नागरिकांनी या सोडतीत सहभाग घेऊन या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन गृहस्वप्नपूर्ती करावी.
Mhada Lottery FCFS म्हणजेच First Come First Serve साठी अर्ज करण्यास इथे क्लिक करा.
Mhada Lottery Konkan 2023 Important Dates :
Mhada Lottery Konkan 2023 | |
Mhada Lottery Konkan 2023 Application Start Date |
08th April 2023 |
Mhada Lottery Konkan 2023 Application Last Date |
10th April 2023 |
Mhada Lottery Konkan 2023 Application Draw Date |
10th May, 2023 |
Mhada Lottery Konkan Apply | LINK |
Payment Acceptance Last Date | 12th April 2023 |
Publication of accepted application for draw | 27th April 2023 |
म्हाडाच्या सोडतीसाठी वापरण्यात येणारी संगणकीय प्रणाली अत्यंत पारदर्शक आहे. म्हाडातर्फे उभारण्यात आलेल्या सदनिकांची विक्री करण्यासाठी म्हाडाने आपल्या संगणकीय सोडत प्रणालीत महत्तत्त्वपूर्ण बदल केले असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अद्ययावत अशा नवीन संगणकीय प्रणालीचा अवलंब केला आहे. त्यामुळे ही सोडत प्रक्रिया आता पूर्णपणे मानवी हस्तक्षेपविरहीत करण्यात आली आहे. त्यामुळे सोडत आज्ञावली अधिक पारदर्शक, सुलभ आणि सुरक्षित झाली आहे. सदनिकेसाठी अर्ज करण्यापासून ते ताबा मिळेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाईन करण्यात आली आहे. नवीन संगणकीय सोडत प्रणाली म्हाडासाठीच नव्हे, तर नागरिकांसाठी देखील एक पर्वणी ठरणार आहे. या संगणकीय प्रणालीमुळे सदनिकेचा ताबा सोडतीतील विजेत्या अर्जदारास लवकर मिळणार आहे.
इच्छुक अर्जदारांनी कोकण मंडळाच्या सदनिका विक्री सोडतीत थेट ऑनलाईन प्रक्रियेनेच सहभाग घ्यावा आणि यासाठी कोणत्याही मध्यस्थांची मदत घेऊ नये. तुम्हाला हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी म्हाडाच्या संगणकीय सोडत प्रणालीची पारदर्शक साथ मिळणार आहे. सोडतीत सहभागी होणाऱ्या सर्व अर्जदारांना गृहस्वप्नपूर्तीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !
कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा विभागीय घटक) ४ हजार ६५४ सदनिकांची संगणकीय सोडत काढण्यात येत आहे. परवडणाऱ्या घरांच्या सोडतीच्या माध्यमातून सर्वसामान्यांची गृहस्वप्नपूर्ती करून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याच्या या प्रयत्नाबाबत मोठे समाधान आहे. मुंबई, पुणे सारख्या शहरांमध्ये स्वतःचे हक्काचे आणि परवडणाऱ्या दरात घर घेण्यासाठी सर्वसामान्यांकरिता 'म्हाडा हा आशेचा किरण आहे. म्हाडाने आतापर्यंत सामाजिक बांधिलकीचा वसा जोपासत सुमारे पाच लाख परवडणाऱ्या घरांची उभारणी केली आहे. त्यातील सुमारे अडीच लाख परवडणारी घरे मुंबई शहर व मुंबई उपनगरात उपलब्ध करून दिली असून ही कौतुकास्पद बाब आहे. म्हाडाच्या कोंकण मंडळानेही आजतागायत सुमारे ५६ हजार सदनिकांची उभारणी केली आहे.
म्हाडाने संगणकीय सोडत आणखी लोकाभिमुख व सुलभ करीत सर्वसामान्य अर्जदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. अर्जदारांनी आता केवळ संकेतस्थळावर कागदपत्रे घरबसल्या जमा करायची असून त्यांची पडताळणीही ऑनलाईनच होणार असल्याने सोडत प्रक्रिया अधिक पारदर्शक, सोपी व सुलभ झाली आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत चाळीतील भाडेकरू, रहिवाशांचे प्रशस्त व अद्ययावत सुविधांनी सज्ज घरात पुनर्वसन केले जाणार आहे. धोकादायक इमारतींच्याबाबतीत म्हाडा अंतर्गत एकल इमारतींच्या पुनर्विकासाला राज्य शासनाने परवानगी दिली आहे.
म्हाडाने विविध जिल्ह्यांत सुमारे ६ हजार ८३९ परवडणारी घरे तसेच ८७ भूखंड सोडतीद्वारे उपलब्ध करून दिली आहेत. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) या योजनेच्या उद्दीष्टपूर्तीसाठीही शासन प्रयत्नशील आहे. म्हाडाच्या कोंकण मंडळातर्फे आता ४ हजार ६५४ सदनिकांची सोडत काढण्यात येत आहे. हक्काचे आणि परवडणाऱ्या दरात घर उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नाचा हा भाग आहे. अशाच प्रकारे भविष्यातही म्हाडाच्या माध्यमातून जास्तीत जास्त परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे.
Mhada Lottery Konkan 2023 चे संपूर्ण माहितीपत्रक वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
हे सुध्दा वाचा