महसूल मंत्र्याची मोठी घोषणा | या 12 हजार 793 कोतवालांचा पगार झाला डबल ? जाणून घ्या संपूर्ण माहिती...

Kotwal Salary

Kotwal Salary | राज्यातील कोतवालांच्या पगारवाढीला वित्त विभागाने मंजुरी दिली आहे. कोतवालांचे मानधन आता 7500 रुपयांवरून 15000 रुपये करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 9 मार्च 2023 रोजी कोतवालांच्या वेतनवाढीबाबत राज्याचा 2023-24 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना केलेल्या घोषणेनुसार मंत्रिमंडळाने कोतवालांच्या वेतनवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. सादर करताना केलेल्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने दिनांक १७ मार्च, २०२३ रोजीच्या बैठकीत मान्यता दिलेली आहे. त्यानुसार सध्या सेवा कालावधीनुसार कोतवालांना मिळत असलेले मानधन ७ हजार ५०० रुपयावरून १५ हजार करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व १२ हजार ७९३ कोतवालांना यापुढे दरमहा सरसकट १५ हजार इतके मानधन लागू करण्यात आले आहे. १५ हजार रुपये इतके मानधन दि. ०१ एप्रिल २०२३ पासून अनुज्ञेय असणार आहे.

Kotwal Salary | कोतवालचा पगार दुप्पट झाला

राज्यातील कोतवालांच्या मानधनात वाढ करण्यास वित्त विभागाने मंजुरी दिली असून आता कोतवालांचे मानधन थेट सात हजार पाचशे वरून पंधरा हजार रुपये करण्यात आले आहे. कोतवालांच्या पगारात एकूण आठ हजार रुपयांची वाढ करण्यात आल्याने कोतवाल कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

राज्यातील 12 हजार 793 कोतवालांच्या पगारात वाढ

सध्या कोतवाल यांना सेवा कालावधीनुसार 7 हजार 500 मानधन मिळते. राज्यभरात गावपातळीवर कार्यरत असलेल्या एकूण 12 हजार 793 कोतवालांना आता दरमहा 15 हजार रुपये मानधन मिळणार आहे. हा मोबदला दि. 1 एप्रिल 2023 पासून याची अंमलबजावणी होणार आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली.

Kotwal Salary

हेही वाचा : कोकणात घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण | म्हाडाने काढली 4,654 घरांची महा-लॉटरी;

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा महसूल मंत्र्याची मोठी घोषणा | या 12 हजार 793 कोतवालांचा पगार झाला डबल ? जाणून घ्या संपूर्ण माहिती... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.