मुख्यमंत्र्याचा मोठा निर्णय | आता घर बांधण्यासाठी परवानगी काढायची गरज नाही, याचा 55 हजार कुटुंबांना होणार फायदा...

Eknath Shinde Big News | आता राज्यात 1500 चौरस फुटापर्यंतचे घर बांधण्यासाठी कोणत्याही परवानगीची गरज लागणार नाही, असे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता घर बांधण्याचा विचार करणाऱ्यांची सरकारी कार्यालयांचे उंबरठे ओलांडण्याच्या त्रासातून मुक्तता होणार आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. ते औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी औरंगाबाद महानगरपालिकेच्या हद्दीत सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला.
हे सुद्धा वाचा : कुसुम सौरपंपाचा जिल्हानिहाय कोठा वाढणार ? इथे पहा जिल्हानिहाय अर्ज
यावेळी ते म्हणाले, '31 डिसेंबर 2020 पर्यंत सर्व बांधकामे नियमित होतील. दुसरीकडे, येथून 1500 चौरस फुटांपर्यंतचे घर बांधायचे असेल, तर महापालिकेच्या परवानगीची गरज भासणार नाही. नगरविकास विभागाच्या या निर्णयामुळे अनेक छोट्या ग्राहकांची शासकीय कार्यालयात जाण्याच्या त्रासातून सुटका होणार आहे. याचा फायदा राज्यातील 55 हजार कुटुंबांना होणार आहे. यासोबतच 3 हजार स्क्वेअर फुटांपर्यंत घरे बांधणाऱ्यांना 10 दिवसांत परवानगी दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
Eknath Shinde Big News : मुख्यमंत्र्याचा मोठा निर्णय | आता घर बांधण्यासाठी परवानगी काढायची गरज नाही, याचा 55 हजार कुटुंबांना होणार फायदा...
याशिवाय राज्यातील शेतकऱ्यांच्या वीज बिलाच्या थकबाकीबाबतही त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. राज्यातील वीज बिलांच्या थकबाकीमुळे अनेक शेतकऱ्यांची वीज खंडित झाली आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्र्यांशी बोलणार असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.
त्याचवेळी या पत्रकार परिषदेत त्यांनी पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी काहीही वक्तव्य करण्याचे टाळले आहे. या घटनेची संपूर्ण माहिती माझ्याकडे नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच याबाबत बोलू, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण सध्या राज्यात चर्चेत असून शिवसेनेचे संजय राठोड यांचे नाव समोर आले आहे. हा मुद्दा संवेदनशील असून त्यावर आताच विधान करणे योग्य होणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
हे सुद्धा वाचा : विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली | अखेर दहावीच्या निकालाची तारीख आली...
हे सुध्दा वाचा