कारागिरांनो.., पीएम विश्वकर्मा योजनेचा असा घ्या लाभ | जाणून घ्या संपूर्ण माहिती...

PM Vishwakarma

PM Vishwakarma Yojana 2023 : देशाचे पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोडी यांनी खेडेगावातील बलुतेदारांना त्यांच्या श्रमाचे योग्य मोल मिळावे आणि त्यांची कौशल्ये सुधारावीत यासाठी नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. कारागिरांच्या विकासासाठी ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश देशातील बेरोजगारी कमी करणे आणि गरीब कारागिरांना अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांची आर्थिक स्थिती सुधारणे हा आहे. ही योजना पारंपारिक कौशल्य असलेल्या लोकांना त्यांचा व्यवसाय उभारण्यास मदत करेल. या योजनेत लोकांना केवळ कर्जच मिळणार नाही तर कौशल्य प्रशिक्षणही मिळणार आहे. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा फायदा लोहार, सोनार, कुंभार, सुतार आणि मोची यांसारख्या पारंपारिक कौशल्य असलेल्या लोकांना होईल. अशा 18 पारंपरिक कामांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.

PM Vishwakarma

हे सुद्धा वाचा : आता इन्स्टाग्रामवर स्टोरी बनवा आणखी आकर्षक | इन्स्टाग्रामने आणले हे नवीन फिचर...

या योजनेंतर्गत कारागिरांना आधुनिक उपकरणांचे प्रशिक्षण दिले जाणार असून या प्रशिक्षणादरम्यान 500 रुपये भत्ताही दिला जाणार आहे. याशिवाय प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उपकरणे खरेदीसाठी 15 हजार रुपयांपर्यंतची मदतही दिली जाणार आहे. 

PM Vishwakarma Yojana Benefits : पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचे फायदे

  • आर्थिक मदत
  • जगभरातील बाजारपेठांमध्ये प्रवेश असेल
  • वाणिज्य आणि उद्योजकता मंत्रालयाशी संबंधित
  • नवीनतम तांत्रिक प्रगतीमध्ये प्रवेश
  • प्रगत कौशल्य प्रशिक्षण

PM Vishwakarma Yojana Eligibility प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेसाठी पात्रता

या योजनेंतर्गत 18 व्यवसायांपैकी, स्वयंरोजगाराच्या आधारावर असंघटित क्षेत्रात हात आणि साधनांसह काम करणारे कुटुंब-आधारित पारंपरिक कारागीर नोंदणीसाठी पात्र असतील. प्रत्येक कुटुंबातील एका सदस्यालाच लाभ मिळेल. कुटुंब म्हणजे पती, पत्नी आणि अविवाहित मुले. नोंदणीच्या तारखेला लाभार्थी 18 वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे. जर एखाद्याला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याला त्याच व्यवसायात काम करावे लागेल ज्यामध्ये त्याने नोंदणीच्या वेळी व्यवसाय करण्याची माहिती दिली होती. मागील ५ वर्षात स्वयंरोजगार आणि व्यवसाय विकासासाठी इतर योजनांतर्गत कर्ज घेतलेले नसावे. (उदाहरणार्थ केंद्र, सरकार किंवा राज्य सरकारचे PMEGP/CMEGP) PM स्वानिधीचे लाभार्थी ज्यांनी त्यांच्या कर्जाची परतफेड केली आहे ते प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत पात्र असतील. शासकीय सेवेत कार्यरत व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय या योजनेसाठी पात्र असणार नाहीत.

PM Vishwakarma Yojana Skills: प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचे लाभ/ फायदे 

यशस्वी नोंदणी आणि पडताळणीनंतर लाभार्थीला पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र दिले जाईल. कौशल्य पडताळणीनंतर, पाच दिवसांचे मूलभूत प्रशिक्षण आणि 15 दिवसांचे प्रगत प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षण कालावधी दरम्यान प्रत्येक प्रशिक्षणार्थीला प्रतिदिन 500 रुपये स्टायपेंड मिळेल. यानंतर, प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या कारागिरांना टूलकिट (व्यावसायिक साहित्य) खरेदी करण्यासाठी 15,000 रुपयांचे ई-व्हाउचर दिले जाईल. मूलभूत कौशल्य प्रशिक्षणानंतर लाभार्थी योजनेच्या लाभासाठी पात्र होईल. पहिल्या टप्प्यात, 1 लाख रुपयांपर्यंतचे तारण-मुक्त कर्ज 18 महिन्यांच्या परतफेडीच्या कालावधीसह 5 टक्के व्याजावर उपलब्ध असेल. दुसऱ्या टप्प्यात, प्रगत कौशल्य प्रशिक्षण तसेच डिजिटल व्यवहारांचा अवलंब करणाऱ्या कारागिरांना 18 महिन्यांच्या परतफेडीच्या कालावधीसह 2 लाख रुपयांपर्यंतचे तारण-मुक्त कर्ज मिळेल. डिजिटल व्यवहार प्रोत्साहन लाभार्थ्यांना जास्तीत जास्त 100 व्यवहारांसाठी 1 रुपये प्रति महिना प्रोत्साहन मिळेल. त्यांना मार्केटिंग सपोर्ट प्रमोशन, गुणवत्ता प्रमाणीकरण, ब्रँडिंग आणि प्रदर्शनांसाठी विविध सरकारी एजन्सींचे समर्थन मिळेल.

PM Vishwakarma Yojana Registration : अशी करा नोंदणी

ग्रामीण भागातील सुविधा केंद्रावर (CSC Center) आपली माहिती भरून नोंदणी करावी. ही माहिती गावाचे सरपंच तपासून योग्य असलेल्या उमेदवारांची माहिती व अर्ज जिल्हा समितीकडे पाठवितात. जिल्हास्तरीय समिती या यादीतील कारागिरांना प्रशिक्षणासाठी निवड केली जाते.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा कारागिरांनो.., पीएम विश्वकर्मा योजनेचा असा घ्या लाभ | जाणून घ्या संपूर्ण माहिती... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.