मोफत टॅब आणि 6GB/DAY इंटरनेट मिळवण्याची हि संधी सोडू नका, आत्ताच करा अर्ज; हि आहे शेवट तारीख

Mahajyoti Yojana

Mahajyoti Yojana | महाराष्ट्र शासन इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई कार्यालय, व्यवस्थापकीय संचालक, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांच्या अंतर्गत हि योजना सुरु करण्यात आली आहे.

Mahajyoti Yojana

Mahajyoti Yojana अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती- विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून MHT-CET/JEE/NEET 2025 करीता पुर्व प्रशिक्षण या योजने अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहे. महाज्योती मार्फत MHT-CET/JEE/NEET परिक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB/Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येते.

योजनेच्या लाभासाठी पात्रता :

  • उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा/ असावी.
  • उमेदवार हा इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा/असावी.
  • उमेदवार हा नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा/ असावी
  • जे विद्यार्थी सन 2023 मध्ये 10 वी ची परिक्षा देत आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असून त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करतांना 10 वी चे प्रवेश पत्र व 9 वी ची गुणपत्रिका जोडावी.
  • विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असावा. ज्या बाबतची कागदपत्रे त्याने भविष्यात सुचनांनुसार अपलोड करणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे : 

  • 9 वी ची गुणपत्रिका
  • 10 वी परिक्षेचे ओळखपत्र
  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • जातीचे प्रमाणपत्र
  • वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र

अर्ज कसा करावा :

  • महाज्योतीच्या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील "Application for CET/JEE/NEET 2025 Training" यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा. 
  • अर्जासोबत 'ब' मध्ये नमूद कागदपत्रे स्वाक्षांकीत करुन स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन अपलोड करावे.

अटी व शर्ती :

  • अर्ज करण्याचा अंतिम दि.10/04/2023 आहे.
  • पोस्टाने किंवा ई-मेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे याबाबतचे सर्व अधिकार है व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचे राहतील.
  • अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call Centre वर संर्पक करावा : संर्पक क्र. 0712-2870120/2 -E-mail Id : mahajyotijeeneet24@gmail.com
  • 10 वी चा निकाल लागल्यावर विद्यार्थ्यांकडून 10 वी ची गुणपत्रिका, विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला (बोनाफाईट सर्टिफिकेट) व MHT-CET/JEE / NEET या परिक्षेची तयारी करत आहोत असे हमीपत्र मागविण्यात येतील.

Click here to apply for Mahajyoti Yojna

 

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा मोफत टॅब आणि 6GB/DAY इंटरनेट मिळवण्याची हि संधी सोडू नका, आत्ताच करा अर्ज; हि आहे शेवट तारीख या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.