MAHADBT YOJNA | महाडीबीटी अंतर्गत अनुदानावर बीज भरणा योजना सुरु; असा करा अर्ज

MAHADBT YOJNA

​MAHADBT YOJNA | महाडीबीटी अंतर्गत बीज भरणा योजनेला सुरुवात; असा करा अर्ज MAHADBT YOJNA बियाणे, औषधे व खते हे राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून वितरण अनुदान २०२३ या योजनेच्या संबंधित आपण या लेखात आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. या मध्ये बी-बियाणे अनुदानात समाविष्ट जिल्हे कोणते व त्या अनुदानावर पिके कोणती, त्यासाठी पात्रता काय, आणि हो आवश्यक कागदपत्रे कोणती लागतील, अर्ज कुठे आणि कसा करायचा इत्यादी सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या लेखात बघणार आहोत. या योजनेअंतर्गत जर तुम्हाला लाभ मिळवायचा असेल, तर हा लेख संपूर्ण नक्कीच वाचा.

पिकांसाठी पेरणीसाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत औषध, बी-बियाणे, तसेच खते इत्यादीसाठी ऑनलाईन अर्ज हे महाडीबीटी या पोर्टल वरती सुरू आहेत. या योजनेचा तुम्ही नक्कीच लाभ घ्यावा. MAHADBT YOJNA राज्य शासनाच्या या पोर्टलवर शेतकरी योजना शीर्षका या अंतर्गत बी-बियाणे, औषधे आणि खते इत्यादी घटकाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा हि उपलब्ध करून देण्यात आली आहे. आपण यामध्ये तुर, मुग,सोयाबीन,मका , उडीद, खरीप ज्वारी या बियाणे करीत तुम्ही अर्ज हे करू शकता. या योजनेमध्ये अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याची/ लाभार्थ्यांची निवड प्राप्त सर्व अर्जा मधून लॉटरी पद्धतीने लाभार्त्याची निवड हि करण्यात येईल. या लॉटरी पद्धतीद्वारे ज्या शेतकरी बंधूंची निवड होईल त्याच लाभार्थ्याला अनुदाना स्वरूपावर बी- बियाणे मिळेल. अर्ज ज्या पिकाच्या बियाण्यासाठी केला आहे, उपलब्धतेनुसार त्याच पिकाचे बियाणे व वाण मिळेल. 

MAHADBT YOJNA अर्ज कसा करावा : 

  • MAHADBT Login शेतकरी पोर्टलला भेट द्यावी.
  • यानंतर यावेबसाईट आपले शेतकरी लॉगीन करावे.
  • लॉगीन केल्यावर अर्ज करा या बटनावर क्लिक करावे.
  • दिसणाऱ्या अनेक योजनांपैकी बियाणे औषधे व खते या पर्यायासामोरील बाबी निवडा या पर्यायावर क्लिक करावे.
  • या ठिकाणी तुम्हाला दोन प्रकारच्या बियाण्यांसाठी अर्ज करता येतो.
    • १) पिक प्रात्यक्षिक बियाणे - पिक प्रात्यक्षिक बियाण्यास १०० टक्के अनुदान दिले जाते
    • २) प्रमाणित बियाणे - प्रमाणित बियाण्यांसाठी जास्तीत जास्त ५० टक्के पर्यंत अनुदान दिले जाते.
  • बियाणे औषधे व खते योजनेचा अर्ज ओपन झाल्यावर योग्य ती माहिती भरा.
  • विविध पिकांसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो.
  • अर्ज व्यवस्थित भरल्यानंतर अर्ज जतन करा या बटनावर क्लिक करा.
  • पहा या बटनावर क्लिक करून योजनेस प्राधान्य द्या.
  • अर्ज करा या बटनावर क्लिक करताच २३.६० एवढी फी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे किंवा आपण या आधी या वर्षीचे फी भरले असेल तर आपणास पुन्हा फी भरण्याची गरज नाही.
  • दिलेल्या पेमेंटचा पर्याय वापरून पेमेंट करा आणि पेमेंट पावतीची प्रिंट काढून घ्या.

MAHADBT YOJNA

MAHADBT YOJNA लागणारे कागदपत्रे 

  • ८-अ प्रमाणपत्र
  • ७/१२ प्रमाणपत्र
  • आधार कार्ड 
  • बँक पासबुक

एकदा पूर्ण अर्ज भरल्या नंतर आपण आपली प्रिंट सांभाळून ठेवावी तसेच जो आपला संपर्क क्रमांक दिलेला असेल त्यावर निवडीचा मेसेज आपल्यास पुढील कार्यवाही करावी.​

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा MAHADBT YOJNA | महाडीबीटी अंतर्गत अनुदानावर बीज भरणा योजना सुरु; असा करा अर्ज या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.