इ.११वीचे केंद्रीय प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन अर्ज भरणे सुरु, आत्ताच करा अर्ज | लिंक उपलब्ध...

11th Admission 2023

विषय : इ.११वी (11th Admission 2023) ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन. २०२३ २४ साठी पूर्वतयारी सुरु करणेबाबत.

उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की, सन. २०१७-१८ पासून मुंबई महानगर क्षेत्र, पुणे-पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रांसह नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील उच्च माध्यमिक शाळांमध्ये इ.११वी चे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येतात. सन. २०२३-२४ मध्ये मुंबई महानगर क्षेत्र, पुणे-पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रांसह नाशिक, अमरावती व नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील इ. ११वी प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने इ. ११वी प्रवेश प्रक्रियेबाबत आवश्यक मार्गदर्शन व दिशानिर्देश विद्यार्थ्यांना मिळणे आवश्यक आहे.

11th Admission 2023 | इ.११ वीस ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

राज्यमंडळ इयत्ता १० वी परीक्षा २०२३ समाप्त झालेली आहे तसेच सीबीएसई, सीआयएससीई इत्यादी मंडळांचे इ.१०वी निकालही जाहीर झालेले आहेत. राज्यमंडळाचा इ.१०वी निकाल लवकरच अपेक्षित आहे. त्यामुळे इ.१०वी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सन २०२३-२४ मधील प्रवेश प्रक्रियेची पूर्वतयारी सुरु करणे आवश्यक आहे. त्यानुसार इ. ११वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन विद्यार्थी पालकांना मिळावे व प्रवेशाबाबत सर्व सूचना वेळेत निर्गमित करता याव्यात यानुषंगाने आवश्यक नियोजन व कृती आराखडा आपले स्तरावरून तयार करावा. क्षेत्रीय स्तरावर समन्वय यंत्रणा सक्षम करुन त्यानुसार कार्यवाही करावी.

उक्त ऑनलाईन प्रवेश क्षेत्र वगळता उर्वरित महाराष्ट्रातील प्रवेश प्रचलित पद्धतीनुसार कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरुन करण्यात येत आहेत. अशा ऑनलाईन क्षेत्राबाहेरील विद्याथ्र्यांनाही या प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करावे.

मागासवर्गीय अथवा विशेष प्रवर्गात समाविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांना लागू असलेल्या आरक्षणाचा लाभ घेता यावा यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे अगोदरच काढून ठेवणेबाबत जागृत करावे. अशा विद्यार्थ्यांना सदर कागदपत्रे वेळेत मिळवून देण्यासाठी विशेष मोहिम राबविणेबाबत विनंती सबंधित महसूल यंत्रणेस करणे, माध्यमिक शाळांनी आपले विद्यालयातील इ.९वी १० वी मधील विद्यार्थ्यांना याबाबत सूचित करून शाळेत असतांनाच अशी कागदपत्रे विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे अशा उपाययोजना कराव्यात.

इ. ११वी केंद्रीय ऑनलाईन प्रक्रिया २०२३-२४ साठी पूर्वतयारी त्वरीत सरु करणेत यावी. त्यासाठी प्रवेश प्रक्रियेचे टप्पे समजावून घेऊन त्यानुसार नियोजन करावे. विद्यार्थी, पालक यांचेसाठी उद्बोधन वर्ग आयोजित करावेत, शाळा मार्गदर्शन केंद्रांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करावे. प्रवेश प्रक्रियेबाबत व्यापक प्रसिद्धी द्यावी. शंका समाधान व्यवस्था करावी. सन. २०२३-२४ इ. ११वी केंद्रीय ऑनलाईन प्रक्रियेच्या विविध टप्पे व संभाव्य वेळापत्रक सोबत संलग्न आहे, त्यानुसार प्रसिद्धी देऊन पुढील कार्यवाही सुरु करणेत यावी.

11th Admission 2023

11th Admission 2023-24 अधिक माहिती वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा इ.११वीचे केंद्रीय प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन अर्ज भरणे सुरु, आत्ताच करा अर्ज | लिंक उपलब्ध... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.