पोलीस पाटील भरती या जिल्ह्याचे अर्ज सुरु | दहावी पास उमेदवार सुद्धा करू शकतात अर्ज...

Police Patil Bharti

Maharashtra Police Patil Bharti 2023 – ऑनलाईन अर्ज करा @mahapolice.gov.in महाराष्ट्र पोलीस पाटील अधिसूचना 2023 महाराष्ट्र पोलीस विभागाच्या अधिका-यांद्वारे लवकरच प्रसिद्ध केली जाईल. महाराष्ट्र राज्य पोलिसांकडून सरकारी नोकऱ्या जाहीर होण्याची आतुरतेने वाट पाहणारे उमेदवार या महाराष्ट्र पोलिस पाटील भरती 2023 साठी अर्ज करू शकतात. आम्ही पगार, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया इत्यादी सर्व महत्त्वाचे तपशील दिले आहेत.

वर्धा जिल्हयातील हिंगणघाट उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील (हिंगणघाट व समुद्रपुर तालुका) गावात पोलीस पाटील पदभरतीसाठी अर्हताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन पध्दतीने https://hinganghat.ppbharti.in या संकेत स्थळावर अधिकृत अर्ज मागविण्यात येत आहे.

Police Patil Bharti

Police Patil Bharti पोलीस पाटील पदाची मूळ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

सरळसेवा भरती प्रक्रीयेची सविस्तर जाहीरात https://hingangha.ppbharti.in आणि www.wardha.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. अर्जदाराने संपूर्ण प्रक्रीया काळजीपूर्वक समजून ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत. पोलीस पाटील पदांचे परिक्षेचे अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्विकारले जातील. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची स्थळात कागदपत्रांच्या साक्षांकीत प्रतीसह परिक्षा शुल्काच्या उपविभागीय अधिकारी कार्यालय हिंगणाघाट यांचे खात्यामध्ये यशस्वीरित्या जमा झाल्याबाबतची पावती विहित परिक्षा शुल्क असलेले अर्ज दिनांक 16.05.2023 पर्यंत सायंकाळी 05.00 पर्यंत सादर करावा. इतर कोणत्याही प्रकारे परिक्षा शुल्क स्विकारण्यात येणार नाही. प्रस्तुत पदाकरीता केवळ उक्त संकेतस्थळावर विहीत ऑनलाईन पध्दतीने भरलेले अर्ज ग्राहय धरण्यात येतील, सदर संकेतस्थळावर भरती प्रक्रिया दरम्यान वेळोवेळी भेट देवून भरतो प्रक्रीयेच्या माहितीबाबत अद्यावत व जागृत राहण्याची जवाबदारी अर्जदाराची राहील भरणा केलेले परीक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत करण्यात येणार नाही.

Police Patil Bharti

Police Patil Bharti वर्धा जिल्ह्यासाठी अर्ज करण्यास इथे क्लिक करा.

भरती प्रक्रिया परिक्षा स्थगित करणे किंवा रद्द करणे, अंशत: बदल करणे पदाच्या एकूण व आरक्षण प्रवर्गनिहाय संख्येमध्ये वाद किंवा घट करण्याचे अधिकार तसेच भरती प्रक्रिये संदर्भात बाद तक्रारी बाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकारी उपविभागीय दंडाधिकारी, हिंगणघाट यांनी राखून ठेवले असून त्याचा निर्णय अंतिम असेल याची सर्वानी नोंद घ्यावी. हिंगणघाट उपविभागातील पोलीस पाटीलांची मंजूर पद रिक्त पदं, तसेच 30% महिलांसाठी आरक्षित ठेवलेली पदे विचारात घेवून सद्यस्थितीत जो पदे भरणे आवश्यक आहे. त्याबाबतची माहिती खालीलप्रमाणे आहे.

पोलीस पाटील पदासाठी किमान आवश्यक अर्हता :-

  • अर्जदार हा दहावी (एस.एस.सी) उत्तीर्ण असावा.
  • वयोमार्यादेकरिता अर्जदाराचे दिनांक 04/05/2023 रोजीचे वय विचारात घेतले जाईल.
  • अर्जदाराचे दिनांक 04/05/2023 रोजी 25 पेक्षा कमी नसावे व 45 पेक्षा जास्त नसावे.
  • पोलीस पाटील पदाकरिता वयोमर्यादा शिथिलक्षम नाही.
  • अर्जदार हा स्थानिक व कायम रहिवाशी असावा.
  • अर्जदाराने राशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, आधार कार्ड, ज्या पुराव्याने स्थानिक व कायम रहिवासी असल्याचे सिध्द होते असा कोणताही एक पुरावा मुलाखतीचे वेळी सादर करावा.
  • अर्जदाराने अर्जामध्ये स्वतःचे इ-मेल व WhatsApp नंबर नमूद करावा.
  • अर्जदार शारीरिकदृष्ट्या सक्षम असावाच अर्जदाराचं चरित्र्य निष्कलंक असणे आवश्यक आहे.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा पोलीस पाटील भरती या जिल्ह्याचे अर्ज सुरु | दहावी पास उमेदवार सुद्धा करू शकतात अर्ज... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.