जलयुक्त शिवार अभियान २.० आणि गाळ्मुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना सुरु, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

Jalyukt Shivar Yojana

Jalyukt Shivar Yojana : जलयुक्त शिवार अभियान प्रथम टप्पा तसेच इतर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम न राबविलेल्या व गाव निवडीच्या निकषानुसार पात्र ठरणाऱ्या गावांमध्ये मृद व जलसंधारणाची कामे करणे, जलयुक्त शिवार अभियान प्रथम टप्पा तसेच इतर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविलेल्या व गावांमध्ये पाण्याची गरज असेल व अडविण्यास अपधाव शिल्लक असेल तेथे पाणलोट विकासाची कामे करणे, मृद व जलसंधारणाची कामे लोकसहभागातून करणे व उपलब्ध भूजलाच्या माध्यमातून पाणलोट क्षेत्राचा शाश्वत विकास करण्याकरीता “जलयुक्त शिवार अभियान २.०" राबविण्यास संदर्भ २ येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. सदर शासननिर्णयान्वये जलयुक्त शिवार अभियान २.० हा कार्यक्रम राबविण्याच्या सविस्तर सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

Jalyukt Shivar Yojana : जलयुक्त शिवार अभियान २.० आणि गाळ्मुक्त धारण व गाळयुक्त शिवार योजना या योजना राबविणेबाबत

तसेच राज्यातील जलसाठ्यांमधील गाळ काढणे व तो शेतांमध्ये वापरणे यासाठी राज्यातील जलसाठ्यांतील गाळ काढून तो शेतांत पसरविण्यासाठी “गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना राज्यात कायमस्वरुपी राबविण्याचा निर्णय मृद व जलसंधारण विभागाच्या दिनांक २० एप्रिल, २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे. सदर शासन निर्णयानुसार राज्यातील जलसाठ्यातून गाळ काढण्याबाबतची कार्यपद्धती नमूद केली आहे.

संदर्भ ५ येथील बैठकीच्या इतिवृत्तानुसार जलयुक्त शिवार अभियान २० व गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या दोन्ही योजना शीघ्र गतीने राबविण्याच्या अनुषंगाने कृषि विभागाच्या सक्रीय सहभागाकरीता सूचना प्राप्त झाल्या आहेत. जलयुक्त शिवार अभियान २.० व गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या दोन्ही योजनांच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी स्थापिलेल्या जिल्हा स्तरावरील जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील संनियंत्रण समितीमध्ये जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी हे सदस्य असून तालुका स्तरावरील संनियंत्रण समितीमध्ये तालुका कृषि अधिकारी हे सदस्य आहेत.

Jalyukt Shivar Yojana : GR वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

सदर दोन्ही योजना शीघ्रगतीने व यशस्वीपणे राबविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांनी आवश्यक ती कार्यवाही करावी व सदर दोन्ही योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संकेतांक क्र. २०२३०६०८१७२४४४८५०१ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

Jalyukt Shivar Yojana

हे सुद्धा वाचा : खुषखबर ! अखेर महाराष्ट्र वन विभागाची जाहिरात आली, 2417

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा जलयुक्त शिवार अभियान २.० आणि गाळ्मुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना सुरु, जाणून घ्या संपूर्ण माहिती... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.