ITI उमेदवारांसाठी आनंदाची बातमी | महापारेषण विभाग PCMC मध्ये निघाली अप्रेंटीस पदांची भरती, आत्ताच करा अर्ज...

ITI Apprenticeship

ITI Apprenticeship | महापारेषण विभाग, पिंपरी चिंचवड अंतर्गत शिकाऊ उमेदवारी कायदा १९६१ नुसार शिकाऊ उमेदवार म्हणून सन २०२३-२०२४ करीता वीजतंत्री (Electrician) या ट्रेडमध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सदर शिकाऊ (ITI Apprenticeship) उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी शासनाच्या www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, महापारेषण विभाग, पिंपरी-चिंचवड खालील आस्थापना रजिस्ट्रेशन क्रमांकावर ऑनलाईन अर्ज सादर करणे गरजेचे आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. १८.०६.२०२३ पर्यंत राहील. त्यानंतर झालेल्या ऑनलाईन अर्जाचा शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. वीजतंत्री (Electrician) शिकाऊ उमेदवारांचा प्रशिक्षण कालावधी हा शासनाच्या नियमानुसार १ वर्षाचा राहील. ऑनलाईन अर्जासाठी आवश्यक माहिती खालील प्रमाणे आहे.

ITI Apprenticeship

ITI Apprenticeship : या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

शैक्षणीक अर्हता : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक शिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

विद्यावेतन : शासनाच्या नियमाप्रमाणे लागू राहील.

आस्थापनेचा रजिस्ट्रेशन क्र. ट्रेड एकूण
E10202700049 वीजतंत्री(Electrician) 23 जागा

पदसंख्या : कमी किंवा जास्त करण्याची व भरती प्रक्रियेशी निगडित असलेले सर्व निर्णय घेण्याचे अधिकार व्यवस्थापनाकडे राखीव असतील व सदरचे निर्णय उमेदवारास कळवणे व्यवस्थापनेस बंधनकारक राहणार नाही.

शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी आरक्षण, शासनाच्या विविध नियमानुसार लागू राहील. ऑनलाईन अर्ज सादर करताना एस.एस.सी. उत्तीर्ण गुणपत्रिका व आयटीआय उत्तीर्ण गुणपत्रिका यामध्ये नमूद केलेले नाव व आधारकार्डावर नमूद केलेल्या नावाशी सुसंगत आहे किंवा कसे याची पडताळणी करूनच माहिती भरावी.

एस.एस.सी. गुणपत्र / प्रमाणपत्र व आयटीआय उत्तीर्ण गुणपत्र / प्रमाणपत्र (चार ही सेमिस्टरची) साक्षांकित प्रत ऑनलाईन अर्जामध्ये अपलोड करणे आवश्यक आहे. शिकाऊ उमेदवाराची सही, पालकांची सही, प्रवर्ग, जन्मतारीख, एस.एस.सी. मार्क, आयटीआय मार्क, ही माहिती अचूक भरण्यात यावी. सदर माहिती उपलब्ध न झाल्यास उमेदवाराचा शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही. शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रिये दरम्यान उमेदवाराने राजकीय किंवा इतर अधिकान्याकडून दबाव आणल्यास संबंधीत उमेदवारी रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी. शिकाऊ उमेदवारी ऑनलाईन (Online) अर्ज करताना संपुर्ण माहिती पूर्ण भरलेली असणे आवश्यक आहे तसेच पोर्टलवर फोटो, मूळ प्रमाणपत्राची सुस्पष्ट स्कॅन करून योग्य रीतीने ऑनलाईन (Online) अर्ज सादर करावा. फोटो अथवा मूळ प्रमाणपत्र सुस्पष्ट नसेल तर अशा अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

वयोमर्यादा : १८ ते ३० वर्षे (मागासवर्गीयांसाठी ०५ वर्ष शिथिलक्षम). ऑनलाईन (Online) अर्ज सादर करताना उमेदवाराने सद्यस्थितीत कार्यान्वित असणारा (E- Mail ID) व भ्रमणध्वनी (Mobile No.) क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. व भ्रमणध्वनी क्रमांक कार्यान्वित नसल्यामुळे संपर्क करणे शक्य झाले नाही तर त्याची पूर्ण जबाबदारी उमेदवारावर राहील.

ITI Apprenticeship PCMC : या भरतीची मूळ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

दि १८.०६.२०२३ नंतर ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांचा शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. आरक्षणाचा लाभ घेणान्या उमेदवारांचा ऑनलाईन अर्जासोबत जाती प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तसेच या कार्यालयाने मागणी केल्यास शासकीय नियमाप्रमाणे आरक्षणा संबंधीत कागदपत्रे सादर करणे उमेदवारास बंधनकारक राहील. १४. आर्थिक दृष्टया दुर्बल उमेदवाराने आर्थिक दुर्बल घटकामध्ये मोडत असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

म. रा. वि. पारेषण कंपनीच्या नियमानुसार एस.एस.सी. व आय. टी. आय. यांच्या सारासार गुणांच्या टक्केवारी नुसार तसेच सामाजिक आरक्षणाच्या अधिन राहून प्रवर्गनिहाय निवड यादी प्रसारीत केली जाईल. शिकाऊ उमेदवाराचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यामुळे कंपनीमध्ये नोकरी मिळवण्याचा कोणताही अधिकार प्राप्त होत नाही याची कृपया नोंद घ्यावी.

ITI Apprenticeship

हे सुद्धा वाचा : खुषखबर : पोस्टाची चौथी मेरीट लिस्ट जाहीर, PDF मध्ये आपले नाव शोधा लगेच...

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा ITI उमेदवारांसाठी आनंदाची बातमी | महापारेषण विभाग PCMC मध्ये निघाली अप्रेंटीस पदांची भरती, आत्ताच करा अर्ज... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.