Income Tax Return: आता स्वतः भरा आयकर सीएची गरज नाही; फक्त दोन कागदे डाउनलोड करा

Income Tax Return

Income Tax Return Tips : Income Tax Return भरण्यास सुरु झाले आहे. याची सुरुवात आयकर विभागाने केली आहे. तुम्हीही आयकर रिटर्न भरणार असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. त्यामुळे काही चुकांमुळे तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस मिळते असे आपल्या सोबत होऊ नये साठी काही महत्वाच्या सूचना आणि निर्देश आपण लक्षात ठेवले पाहिजे.

ITR (Income Tax Return) भरणे सोपे झाले आहे. ?

आयकर विभाग प्रत्येक करदात्याला AIS आणि TIS नावाची दोन कागदपत्रे पुरवतो. ही दोन्ही अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे आहेत. विभागाने ITR Filling मध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि करदात्यांना Self Filling सेल्फ-फाइलिंगची सुविधा देण्यासाठी या दोन्हीची गोष्ठी सुरु केल्या आहेत. या दोन्ही कागदपत्रांच्या मदतीने तुम्ही तुमचे आयकर रिटर्न Income Tax Return सहज भरू शकता आणि यासाठी तुम्हाला सीएची गरज भासणार नाही.

AIS आणि TIS म्हणजे काय ?

सर्वप्रथम AIS आणि TIS म्हणजे काय हे जाणून घेऊ. AIS म्हणजे Annual Information Statement आणि Taxpayer Information Summary म्हणजे करदात्याची माहिती सारांश. AIS आणि TIS करदात्यांनी मिळवलेल्या सर्व उत्पन्नाचा तपशील ठेवतात. तुम्ही बचत खात्यातून व्याज (बचत खात्यावरील व्याज उत्पन्न) किंवा आवर्ती आणि मुदत ठेव उत्पन्न, सिक्युरिटीज व्यवहार किंवा म्युच्युअल फंडांसह लाभांश रक्कम (लाभांश पासून उत्पन्न) मिळवली आहे, हे सर्व तपशील या कागदपत्रांमध्ये असतात.

AIS आणि TIS कडील सर्व माहिती

सोप्या शब्दात, करदात्यांना AIS मध्ये करपात्र रकमेची माहिती एकाच वेळी मिळते. आयकर कायदा, 1961 अंतर्गत परिभाषित केल्यानुसार AIS तुम्हाला पगाराव्यतिरिक्त इतर स्त्रोतांकडून मिळणाऱ्या सर्व उत्पन्नाचा तपशील देते. म्हणजेच करपात्र श्रेणीत येणारे प्रत्येक उत्पन्न त्यात उपलब्ध असेल. ज्यामध्ये TIS हे मुळात AIS चे छोटे रूप आहे.

Income Tax Return

AIS/TIS Download कसे करायचे ?

  • आयकर फाइलिंग पोर्टलवर (www.incometax.gov.in) लॉग इन करा.
  • पॅन नंबर, पासवर्ड वापरून लॉगिन करा.
  • वरील मेनूमधील सर्व्हिस टॅबवर जा.
  • ड्रॉपडाउनमध्ये 'वार्षिक माहिती विधान (AIS)' निवडा.
  • तुम्ही Proceed वर क्लिक करताच एक वेगळी विंडो उघडेल.
  • नवीन विंडोमध्ये AIS पर्याय निवडा.
  • आता तुम्हाला AIS आणि TIS दोन्ही डाउनलोड करण्याचा पर्याय मिळेल.
  • तुम्ही AIS आणि TIS PDF किंवा JSON फॉरमॅटमध्ये डाउनलोड करू शकता.

हेही वाचा : भारतीय नौसेना मध्ये चार्जमन - II च्या ३७२ जागा

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा Income Tax Return: आता स्वतः भरा आयकर सीएची गरज नाही; फक्त दोन कागदे डाउनलोड करा या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.