मित्रांनो तुम्हाला सुद्धा हा मॅसेज आला आहे का ? काय आहे हे ? जाणून घ्या संपूर्ण माहिती....

Emergency Alert

Emergency Alert : नमस्कार मित्रानो, आज सकाळी बऱ्याच जणांना हा मॅसेज पाहायला मिळाला असेल, तर हा मॅसेज : DEPARTMENT OF TELECOMMUNICATIONS च्या अंतर्गत पाठवण्यात आलेला आहे. हे काय आहे ? हा मॅसेज कशामुळे पाठवण्यात आलेला आहे ? याची चिंता तुम्हाला लागलेली असेल, या मध्ये घाबरण्यासारखे काही नाही मित्रानो हा मॅसेज दूरसंचार विभाग अंतर्गत सर्वाना पाठवण्यात आलेला आहे. या विषयी संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखामध्ये वाचायला मिळेल.

Emergency Alert

Emergency Alert : आज आलेला मेसेज नेमका काय होता आणि कुणी पाठवला ? 

Emergency Alert : आज घडलेली घटना म्हणजे भरपूर लोकांना पूर्व सूचना नसल्यामुळे लोक विचारात पडले आहेत कि असा मेसेज अचानक कसा आला आहे म्हणून. भारत सरकारने देशभरातील लाखो नागरिकांपर्यंत पोहोचणाऱ्या सर्व मोबाईल फोनवर देशव्यापी आपत्कालीन इशारा जारी केला आहे. ही आपत्कालीन सूचना वायरलेस इमर्जन्सी अलर्ट (WEA) प्रणालीद्वारे प्रसारित केली गेली आणि एकही विशिष्ट क्षेत्रातील सर्व सक्रिय मोबाइल फोनवर पाठविण्यात आलेली आहे. या मेसेज मध्ये त्यांनी स्पष्ठ उल्लेख केला आहा कि हा फक्त एक चाचणी मेसेज / संदेश आहे म्हणून याचा उपयोग हा भविष्यातील उद्भाणाऱ्या धोक्याबद्दल किंवा संभाव्य आपत्तीबद्दल महत्त्वाची माहिती देऊ शकतो.

Emergency Alert : नागरिकांच्या सुरक्षितते बाबत या मध्ये भविष्यात अलर्ट येऊ शकतात. हा सार्वजनिक सुरक्षा आणि आपत्कालीन मदत वाढविण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग असलेली चेतावणी प्रणाली प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर वापरली गेली. चेतावणी मजकूर संदेशाच्या स्वरूपात आली आणि लोकांचे लक्ष त्वरित वेधून घेण्यासाठी एक मोठा आणि विशिष्ट आवाजासह हा मेसेज पाठविण्यात आलेला आहे. आणीबाणीच्या सूचना संदेशाच्या सामग्रीमध्ये सामान्यतः धोक्याच्या स्वरूपाविषयी थोडक्यात परंतु महत्त्वाची माहिती या मधून भविष्यात येऊ शकते. 

Emergency Alert : कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त लोकांना सूचित करून अधिक लोकांना मदत होईल यासाठी या सुविधेचा वापर भविष्यात केला जाऊ शकतो. या मध्ये सध्या कोणत्याच माध्यमातून सरकारने देशव्यापी आपत्कालीन इशारे जारी करण्याचे कोणतेही विशिष्ट कारण घोषित केले नाही. अशा सूचना फायदा सहसा नैसर्गिक आपत्तींसाठी म्हणजे भूकंप, पूर, चक्रीवादळ, यासाठी केला जाऊ शकतो म्हणजे ज्या त्या भोगोलिक क्षेत्रातील लोकांना याचा अलर्ट दिला जाईल. अश्या कोणत्याही परिस्थितीसाठी लोकांना अलर्ट मिळणार आहेत अश्या सुविधेचा वापर करून संभाव्य धोका आणि जीवित हानी कमीत कमी करता येऊ शकते. 

Emergency Alert : या सुविधेचा वापर करून सरकारला लोकसंख्येच्या मोठ्या भागापर्यंत त्वरित पोहोचून अलर्ट देता येणार आहे. मग ते कुठेही राहत असतील किंवा मोबाईल मध्ये कोणतेही सीम कार्ड असेल महत्वाचे अपडेट हे अलर्टच्या माध्यमातून मिळतील. भविष्यात अश्या स्वरूपाच्या येणाऱ्या अलर्ट बद्दल लोकांनी गांभीर्याने लक्ष देणे आणि सूचनाचे पालन करणे महत्वाचे आहे. हे तंत्रज्ञान या आधी जपान सारख्या देशामध्ये वापरले जात आहेत जिथे भूकंप आणि सुनामी सारखे अपडेट लोकांना दिले जातात. हि चेतावणी प्रणाली आपल्या कडे नवीन आहे आणि भविष्यात या मध्ये काही नवीन बदल सुद्धा अपेक्षित आहे. सदरील मेसेज किंवा अलर्ट बद्दल जास्तीत जास्त माहिती मिळताच आपल्याला या लेखामध्ये किंवा आपल्या या सन्केतस्थळावर कळविण्यात येईल.

पुन्हा एकदा हि एक नवीन सरकारी अलर्ट देणारी प्रणाली आहे याचा नक्कीच लोकांना फायदा होईल. आणि जास्तीत जास्त लोकांना आपत्कालात मदत मिळण्यात मदत होईल.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा मित्रांनो तुम्हाला सुद्धा हा मॅसेज आला आहे का ? काय आहे हे ? जाणून घ्या संपूर्ण माहिती.... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.