एक देश एक रेशन कार्ड योजनेस सुरुवात, काय आहे योजना ? जाणून घ्या. GR उपलब्ध...

Ration Card

Ration Card : एक देश एक रेशन कार्ड (ONORC) या योजनेची सुरुवात २०१८ मध्ये केंद्र शासनाद्वारे Integrated Management of Public Distribution System (IM-PDS) म्हणून करण्यात आली. एक देश एक रेशन कार्ड (ONORC) या योजनेबाबत केंद्र शासनाने संदर्भाधिन क्र.०१ व ०२ येथील दि.०४.०७.२०१९ व दि. १८.०७.२०१९ रोजीच्या पत्रान्वये सविस्तर मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. सदर योजनेतंर्गत लाभार्थ्याला पोर्टेबिलिटीद्वारे कोणत्याही राज्यातील कोणत्याही रास्तभाव दुकानातून आधार Authentication करुन धान्य उचलण्याची सोय उपलब्ध आहे. सदर योजनेचा लाभ राज्यातील स्थलांतरित कामगार, ऊसतोड मजूर, आदिवासी इ. स्थलांतरण करणाऱ्या लाभार्थ्यांना होणार असून सदर लाभार्थीना त्यांच्या स्थलांतरणाच्या ठिकाणी कोणत्याही रास्तभाव दुकानांत त्यांना अनुज्ञेय असलेले अन्नधान्य प्राप्त करुन घेण्याची सुविधा पोर्टेबिलिटीद्वारे ई-पॉस उपकरणांवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याकरीता लाभार्थ्यांना सद्यस्थितीत असलेल्या शिधापत्रिकांवरील १२ अंकी क्रमांकाचा वापर करुन आधार प्रमाणिकरणाद्वारे धान्य वितरीत करण्यात येते. केंद्र शासनाने एक देश एक योजना शिधापत्रिका योजनेसंदर्भात (आंतरराज्य / राज्यांतर्गत) दिलेल्या मार्गदशक सूचनांच्या अनुषंगाने परिपत्रक निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती. त्यानुसार खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

Ration Card

Ration Card : शासन निर्णय (GR) वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

एक देश एक शिधापत्रिका योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे.

१) उद्देश :- राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना पोर्टेबिलिटी सुविधेद्वारे देशभरातील कोणत्याही रास्तभाव दुकानातून अन्नधान्य उचलण्याची सोय उपलब्ध करून देणे.

२) राष्ट्रीय पोर्टेबिलीटी व्याख्या:-

  • स्वगृही राज्य (Home State) :- शिधापत्रिका ज्या राज्याने वितरीत केली आहे ते राज्य.
  • गंतव्य राज्य (Destination State) :- स्वगृही राज्याव्यतिरीक्त ज्या राज्यामधून अन्नधान्याची उचल करण्यात येईल ते राज्य.
  • केंद्रीय विक्री किंमत : तांदूळ रू.०३/-, गहू रू.०२ /- व भरडधान्य रू.०१/- ( सन २०२३ मध्ये १ जानेवारी, २०२३ पासून एक वर्ष कालावधीकरीता मोफत)
  • अन्नधान्य प्रमाण :- अंत्योदय अन्न योजना:- प्रति शिधापत्रिका ३५ कि.ग्रॅ. प्राधान्य कुटुंब योजना:- प्रति व्यक्ती प्रति महिना ५ कि. ग्रॅ.
  • ऑटोमेटेड रास्तभाव दुकान :- ऑनलाईन परिपुर्ण कार्यान्वित ई-पॉस मशीन उपलब्ध असलेले रास्तभाव दुकान..
  • अन-ऑटोमेटेड रास्तभाव दुकान :- ई-पॉस मशीन उपलब्ध नसलेले रास्तभाव दुकान.
  • पोर्टेबिलिटी लाभार्थी :- कोणत्याही राज्यातील असा लाभार्थी जो राष्ट्रीय पोर्टेबिलीटी योजनेंतर्गत गंतव्य राज्यातून अन्नधान्य उचल करण्यास ईच्छुक आहे.

ONE NATION ONE RATION CARD SCHEME 2023

३) एक देश एक शिधापत्रिका योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता :-

  • राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत लाभ घेणार सर्व लाभार्थी एक देश एक शिधापत्रिका योजनेसाठी पात्र आहेत. (ज्या रास्तभाव दुकानांमध्ये मानवी पद्धतीने (un-automated) धान्य वाटप करण्यात येते, त्या रास्तभाव दुकानातील लाभार्थी व राज्य योजनेतील लाभार्थी एक देश एक शिधापत्रिका योजनेचा लाभ घेण्यास पात्र नसतील.)
  • शिधापत्रिकेतील कमीत कमी एक लाभार्थ्याच्या आधार क्रमांक शिधापत्रिकेसोबत संलग्न असावा. लाभार्थ्यांकडे एक पेक्षा अधिक शिधापत्रिका नसावी. (लाभार्थ्याचे नाव इतर शिधापत्रिकांमध्ये समाविष्ट असल्यास असा लाभार्थी या योजनेसाठी पात्र नसेल) शिधापत्रिकेमधील एकही लाभार्थ्याचे इतर दुसऱ्या शिधापत्रिकेमध्ये नाव समाविष्ट नसावे.

४) ई पॉस मशीनवर बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण यशस्वी झाल्यानंतरच लाभार्थ्याला एक देश एक शिधापत्रिका योजनेंतर्गत अन्नधान्याचा लाभ देण्यात येईल.

५) एक देश एक शिधापत्रिका योजनेंतर्गत लाभार्थ्यांने अन्नधान्य उचल करण्याची कार्यपद्धती :-

  • ज्या लाभार्थ्याला एक देश एक शिधापत्रिका योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे असा लाभार्थी गंतव्य राज्यातील (Destination State) कोणत्याही रास्तभाव दुकानांमध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत स्वगृही राज्याने वितरीत केलेली शिधापत्रिका घेऊन जाईल. शिधापत्रिकाजवळ नसल्यास शिधापत्रिकेचा बारा अंकी क्रमांक असणे आवश्यक आहे.
  • रास्तभाव दुकानदार लाभार्थ्याकडील शिधापत्रिकेतील माहितीद्वारे स्वगृही राज्यातील (Home) State) अन्नधान्याची माहिती ई-पॉस मशीनवर प्राप्त करेल.
  • लाभार्थ्यांला स्वगृही राज्यानुसार ( Home State) अनुज्ञेय अन्नधान्य तपशील ई-पॉस मशीनवर प्राप्त झाल्यानंतर बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण करून अन्नधान्य वितरीत करण्यात येईल.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा एक देश एक रेशन कार्ड योजनेस सुरुवात, काय आहे योजना ? जाणून घ्या. GR उपलब्ध... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.