UPI Online पेमेंट करताय ? सावधान...

UPI Online
advertisement

UPI Online पेमेंट करताय ? सावधान ! हल्ली लोक पेमेंट करण्यासाठी पेटीएम, गुगल पे आणि फोन पेसारख्या अँपचा वापर करतात; पण हे अँपलिकेशन वापरताना काळजीही घ्यायला हवी. कारण, सायबर फसवणुकीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत.

UPI PIN :- तुमचा यूपीआय पिन कोणाशीही शेअर करू नका. भलेही ते तुमचे जवळचे मित्र असतील तरीही पिन सांगू नका. कोणाला सांगितला असेल तर पिन बदला.

स्क्रीन लॉक :- ज्याप्रमाणे स्मार्टफोनला लाँक ठेवतात त्याचप्रमाणे अँपलादेखील लॉक ठेवा, जेणेकरून तुमचा फोन हरवल्यास अप कोणीही वापरु शकणार नाही. एकाच अपचा वापर अनेकवेळा लोक ऑनलाइन पेमेंटसाठी एकापेक्षा जास्त पेमेंट अँप वापरतात. शक्य असल्यास एकाच पेमेंट अँपचा वापर करा आणि जास्त अँपचा वापर पैशाच्या व्यवहारासाठी टाळा.

App Update:- सर्व पेमेंट अँप वेळोवेळी अपडेट होतील याची काळजी घ्या. कारण, सायबर हल्ल्यापासून बचावासाठी आणि तुमचा डेटा सुरक्षित राहावा यासाठी कंपन्या आपल्या अॅप्समध्ये अनेक सेफ्टी आणि सिक्युरिटी फीचर्स सतत अपडेट करत असतात.

एकच पासवर्ड:- कितीही पेमेंट अँप फोनमध्ये असले तरी सर्वासाठी एकच पिन ठेवण्याची अनेकांना सवय असते. कारण तो लक्षात राहतो; पण हे धोकादायक आहे. एखाद्या अँपचा पित लीक झाल्यास हॅकर सर्व अँपचा सहज वापर करू शकतो.

UPI Online पेमेंट करताय ? सावधान...

UPI Online

युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ही नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे विकसित केलेली झटपट रिअल-टाइम पेमेंट प्रणाली आहे. इंटरफेस इंटर-बँक पीअर-टू-पीअर (P2P) आणि व्यक्ती-टू-व्यापारी (P2M) व्यवहार सुलभ करतो. दोन बँक खात्यांमध्ये त्वरित निधी हस्तांतरित करण्यासाठी मोबाईल उपकरणांवर याचा वापर केला जातो. डिव्हाइसवरील मोबाइल क्रमांक बँकेकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. पैसे हस्तांतरित करण्यासाठी प्राप्तकर्त्याचा UPI आयडी वापरला जाऊ शकतो. हे तात्काळ पेमेंट सेवेच्या (IMPS) वर ओपन सोर्स अँपलिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (API) म्हणून चालते, आणि भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) द्वारे नियंत्रित केले जाते.

सप्टेंबर 2022 पर्यंत, प्लॅटफॉर्मवर 358 बँका उपलब्ध होत्या ज्यांचे मासिक व्हॉल्यूम 6.7 अब्ज व्यवहार होते. ₹11.16 लाख कोटी (US$140 अब्ज). मे 2021 पर्यंत, प्लॅटफॉर्मचे भारतात 100 दशलक्ष (100 दशलक्ष) मासिक सक्रिय वापरकर्ते आहेत. एकूण डिजिटल व्यवहारातील UPI व्यवहारांचे प्रमाण 2018-19 मधील 23% वरून 2020-21 मध्ये 55% पर्यंत वाढले, ज्याचे सरासरी मूल्य प्रति व्यवहार ₹1,849 होते. जानेवारी 2022 मध्ये, प्लॅटफॉर्मद्वारे ₹8.31 लाख कोटी रुपयांचे डिजिटल व्यवहार केले गेले. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये व्यवहार मूल्य $१ ट्रिलियन ओलांडणार आहे.

advertisement

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा UPI Online पेमेंट करताय ? सावधान... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

आपल्याला विविध प्रकारच्या फॉर्म आणि त्यांची माहिती पाहिजे असल्यास आपण आपल्या जवळच्या सुरेटा नोकरी मदत केंद्र (center.surreta.com) मध्ये सुद्धा भेट देऊ शकता, आपल्याला सुरेटा नोकरी मदत केंद्र मध्ये सर्व प्रकारचे ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्जाच्या प्रिंट मिळतील तसेच कोणतेही माहितीपत्रक प्रिंट करण्याची सोय उपलब्ध तसेच सरकारी योजना आणि शालेय / कॉलेज आणि शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे आपले हक्काचे ठिकाण आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र नक्कीच एकदा भेट द्या. तसेच नवीन नवीन नोकरीचे अपडेट साठी आपण (naukri.surreta.com) वर सुद्धा भेट देऊ शकता किंवा मोबाईल अँप डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करावे Surreta Naukri