SSC HSC EXAM 2023 | दहावी-बारावीच्या परीक्षेत आले हे नवीन नियम ! परीक्षा होणार कडकच...

SSC HSC EXAM 2023
advertisement

SSC HSC EXAM 2023 | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेचे नियम या वर्षी खूप कठीण करण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणार्‍या फेब्रुवारी-मार्च 2023 महिन्यातील दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी यंदा पहिल्या सत्रातील पेपरसाठी साडे दहानंतर आणि दुपारच्या सत्रातील पेपरसाठी अडीच वाजल्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा कक्षात सोडण्यात येणार नाही. तसेच शाळा तिथे परीक्षा केंद्र, अभ्यासक्रम कपात, वाढीव वेळ अशा अनेक सुविधा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये होणारी दहावी-बारावीची परीक्षा कडकच होणार आहे. अशे यामधून स्पष्ट दिसून येत आहे.

SSC HSC EXAM 2023 | महाराष्ट्र राज्य मंडळातील अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे दहावी-बारावी परीक्षेत काही प्रमाणात शिथिलता होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास काही अडचणी आल्या नाहीत. याचा परिणाम म्हणजे दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांच्या टक्केवारीवर मोठ्या प्रमाणात पडला. म्हणजेच विद्यार्थ्याची पास होण्याच्या टक्केवारीत  दरवर्षी पेक्षा कोरोनाच्या काळात वाढ होती. त्याचबरोबर परीक्षेला हजर राहण्याच्या वेळेच्या शिथिलतेमुळे परीक्षेतील गैरप्रकार  वाढले, तसेच पेपर  समाजमाध्यमावर व्हायरल होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे यंदा परीक्षेच्या नियमामध्ये काटेकोरपणा दिसून येत आहे. आणि दहावी बारावीच्या परीक्षा ह्या कडकच होणार अशी अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. यामध्ये कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याच्या वेळेत सवलत दिली जाणार नाही.

SSC HSC EXAM 2023 | दहावी-बारावीच्या परीक्षेत आले हे नवीन नियम ! परीक्षा होणार कडकच...

SSC HSC EXAM 2023

SSC HSC EXAM 2023 |महाराष्ट्र राज्य मंडळामार्फत 2022 च्या परीक्षेमध्ये कोरोनामुळे विद्यार्थ्यांवर झालेल्या परिणामाचा विचार करून अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्यात आली होती. पण या वर्षी तशे काहीही नाही, विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी वाढीव वेळ देण्यात आला होता. तसेच शाळा तिथेच परीक्षा केंद्र ठेवण्यात आले होते. यंदा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव जवळपास नाहीसा झाला आहे. त्यामुळे शाळा तिथे परीक्षा केंद्र न ठेवता जवळच्या शाळेत परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. परीक्षेसाठी देण्यात आलेला वाढीव वेळ रद्द करून पूर्वीप्रमाणेच वेळ निश्चित करण्यात आली आहे. 2023 ची परीक्षा 100 टक्के अभ्यासक्रमावर ठेवण्यात येणार असल्याचे देखील अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

advertisement

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा SSC HSC EXAM 2023 | दहावी-बारावीच्या परीक्षेत आले हे नवीन नियम ! परीक्षा होणार कडकच... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

आपल्याला विविध प्रकारच्या फॉर्म आणि त्यांची माहिती पाहिजे असल्यास आपण आपल्या जवळच्या सुरेटा नोकरी मदत केंद्र (center.surreta.com) मध्ये सुद्धा भेट देऊ शकता, आपल्याला सुरेटा नोकरी मदत केंद्र मध्ये सर्व प्रकारचे ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्जाच्या प्रिंट मिळतील तसेच कोणतेही माहितीपत्रक प्रिंट करण्याची सोय उपलब्ध तसेच सरकारी योजना आणि शालेय / कॉलेज आणि शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे आपले हक्काचे ठिकाण आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र नक्कीच एकदा भेट द्या. तसेच नवीन नवीन नोकरीचे अपडेट साठी आपण (naukri.surreta.com) वर सुद्धा भेट देऊ शकता किंवा मोबाईल अँप डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करावे Surreta Naukri