Shivaji University | शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ५९ वा वार्षिक दीक्षांत समारंभ जाहीर

Shivaji University
advertisement

Shivaji University | शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ५९ वा वार्षिक दीक्षांत समारंभ जाहीर त्याचे विद्यार्थ्यांसाठी निवेदन :-

१.Shivaji University | विद्यापीठाच्या ५९ वा दीक्षांत समारंभासाठी ऑक्टोबर २०२१ मार्च २०२२ सत्रातील आणि यापूर्वीच्या अंतिम परीक्षेमध्ये उत्तीर्ण व पात्र विद्यार्थ्यांनी पदवी, पदविका प्रमाणपत्र मिळण्याकरिता विहित नमुन्यामध्ये ऑनलाईन (Online) अर्ज खाली दर्शविलेल्या मुदतीमध्ये करणे आवश्यक आहे.

अ.क्र. कालावधी विहित शुल्क
१. दि. ०५ डिसेंबर २०२२ ते दि. २४ डिसेंबर २०२२ पर्यंत रु. २५०/-
२. दि. २५ डिसेंबर २०२२ ते दि. २९ डिसेंबर २०२२ पर्यंत रु.३५०/-
३. दि. ३० डिसेंबर २०२२ ते दि. ३ जानेवारी २०२३ पर्यंत रु. ८५०/-
४. पीएच. डी प्राप्त विद्यार्थ्यांचे दीक्षांत अर्ज दि. ०७ जानेवारी २०२३ पर्यंत रु ८५०/- शुल्काने स्वीकारले जातील.

२.Shivaji University | पदवी प्रमाणपत्र मागणीचा अर्ज अधिकृत संकेत स्थळावरून ऑनलाईन पध्दतीने भरावा लागेल. ऑनलाईन अर्ज भरताना प्रथम संकेतस्थळावरील सर्व सूचना वाचाव्यात व आवश्यक ती माहिती सोबत ठेवावी.

३.विद्यार्थ्यांनी यापूर्वी पदवी प्रमाणपत्र घेतले असेल तर पुनःश्च अर्ज करू नये.

४.एका पदवी प्रमाणपत्र अर्जासाठी एक ई-मेल आयडी वापरावा. सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत स्वतः च्या माहितीसाठी जपून ठेवावी, विद्याथ्र्यांनी अर्जाची प्रिंट विद्यापीठात जमा करण्याची आवश्यकता नाही.

५.सर्व विधीशाखा (लॉ) परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी संगणक प्रणाली मधून अर्ज भरताना कोणत्या वर्षांची पदवी प्रमाणपत्र आवश्यक आहे त्या वर्षांचा कोर्सकोड बिनचुक निवडावा. यात चूक झाल्यास त्याची जबाबदारी संबंधितांची राहील.

६.तसेच Regular ऑप्शन व Autonomus ऑप्शनमधून ऑनलाईन अर्ज करताना आलेली माहिती बरोबर आहे की नाही याची खात्री करावी. जर काही दुरुस्ती असेल तर प्रथम संबंधित विभागातून / संबंधित महाविद्यालयातून / स्वायत्त महाविदयालयातून ती दुरुस्ती करून माहिती अपडेट करूनच पदवी प्रमाणपत्राकरीता संबंधित ऑप्शनमधून अर्ज भरावा.

Shivaji University च्या दीक्षांत समारंभासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

Shivaji University

७.२००२ पासून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी रेग्युलर ऑप्शन मधून फॉर्म भरण्यात यावा. तसेच २००२ पूर्वी उत्तीर्ण झालेल्या ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म Regular ऑप्शनमधून भरला जात नाही, त्या विद्यार्थानी फॉर्म भरण्यासंदर्भात प्रत्यक्ष दीक्षांत विभागामध्ये संर्पक साधावा. फॉर्म भरणेकरीता आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत. (अंतीम वर्षांचे मार्कलिस्टची झेरॉक्स, स्वतःचा आयकार्ड साईज फोटोच्या दोन प्रती व फोटोशी साम्य असलेले स्वतः चे आयडेंटी प्रुफ झेरॉक्स, आईचे नावासंदर्भात आवश्यक कागदपत्रे उदा. आईचे आधारकार्ड, वैद्यकीय शाखेच्या (Medical Faculty) विद्यार्थ्यांनी इंटर्नशीप पूर्ण केल्याच्या सर्टिफिकेटची प्रत आणणे आवश्यक आहे.) तसेच ज्या विद्याथ्र्यांना विद्यापीठात येणे शक्य नसेल त्या विद्याथ्र्यांनी दीक्षांत विभागाशी संपर्क साधावा.

८.अर्ज ऑनलाईन भरताना जे विद्यार्थी २००६ पूर्वी उत्तीर्ण आहेत अथवा ज्या विद्यार्थ्यांचे फोटो ऑनलाईन दिसत नाहीत त्यांनी स्वतः च्या फोटोची JPEG Image (20 kb) अपलोड करुन अर्ज ऑनलाईन भरावा.

९.अर्ज भरताना विद्यार्थ्यांचा ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक बिनचूक नमूद करणे आवश्यक आहे.

१०.दीक्षांत समारंभाची तपशिलवार माहिती विद्यापीठाच्या संकेत स्थळावर ठेवण्यात येईल तसेच विद्यार्थ्याना SMS व्दारे कळविण्यात येईल.

११.दीक्षांत शुल्क ऑनलाईन भरत असताना एकदा पेमेंट झालेबाबतचा संदेश आलेनंतर पुन्हा किमान ६० मिनिटे पुनश्च पेमेंट करु नये. अन्यथा (Double Payment) होवू शकते.

१२.वैद्यकीय शाखेच्या (Medical Faculty) विद्यार्थ्यांनी अर्जासोबत विद्यापीठाचे (Internship Completion Certificate) प्रत अपलोड करणे आवश्यक आहे.

१३.ज्या परीक्षांचा निकाल Viva-Voce Exam नंतर जाहीर करण्यात येतो त्या परीक्षेच्या दीक्षांत अर्जासोबत Declaration of Result प्रत सुस्पष्ट अपलोड करणे आवश्यक आहे. (उदा. Ph.D / M.Phil etc.) letter ची प्रमाणित

१४.श्रेणीसुधार परीक्षेस बसून ज्यांच्या निकालात श्रेणीसुधार झालेली आहे अशा विद्याथ्यांनी पदवी प्रमाणपत्र मागणी करताना दीक्षांत अर्जासोबत पूर्वीचे मूळ पदवी प्रमाणपत्र विद्यापीठास परत करणे आवश्यक आहे. श्रेणी सुधारणा झाली नसलेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा अर्ज करु नये.

१५.अर्ज भरताना विद्याथ्र्यांनी आपला पूर्ण पत्ता, पिनकोडसहीत बिनचूक लिहावा/ ऑनलाईन भरावा. चुकीचा पत्ता दिल्यास पत्रव्यवहार / पदवी प्रमाणपत्र पोहचू शकले नाही तर विद्यापीठ प्रशासन जबाबदार राहणार नाही.

१६.दूरशिक्षणव्दारे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व बंद झालेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना, तसेच विद्यापीठ कार्यक्षेत्राबाहेरील (उदा. सोलापूर जिल्हा) विद्याथ्यांना रजिस्टर पोस्टाने पदवी प्रमाणपत्र पाठविण्यात येईल.

१७.दीक्षांत समारंभ आयोजनाची तारीख व त्या संदर्भातील सर्व माहिती यथावकाश कळविणेत येईल. दीक्षांत समारंभापूर्वी पदवी प्रमाणपत्र पात्र विद्यार्थ्यांची यादी व इतर अनुषंगिक सूचना विद्यापीठाच्या वेबसाईटवर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल.

१८.काही तक्रार किंवा दुरुस्ती असल्यास, विद्यार्थ्यांने त्याच्या Log in मधील Grievance मध्ये ती नोंदवावी.

१९.अपुल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही आणि त्याबाबत पत्रव्यवहार करण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी.

२०.ज्या विद्यार्थ्यांना दीक्षांत समारंभानंतर विहित सर्व प्रक्रीया पुर्ण केलेनंतरही पदवीप्रमाणपत्र प्राप्त झाले नसल्यास, त्या विद्यार्थ्यांनी दीक्षांत विभागास समारंभानंतर तीन महिन्याच्या आत संपर्क साधावा, त्यानंतर कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही.

Shivaji University च्या दीक्षांत समारंभाचे अधिकृत माहितीपत्रक वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

advertisement

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा Shivaji University | शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ५९ वा वार्षिक दीक्षांत समारंभ जाहीर या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

आपल्याला विविध प्रकारच्या फॉर्म आणि त्यांची माहिती पाहिजे असल्यास आपण आपल्या जवळच्या सुरेटा नोकरी मदत केंद्र (center.surreta.com) मध्ये सुद्धा भेट देऊ शकता, आपल्याला सुरेटा नोकरी मदत केंद्र मध्ये सर्व प्रकारचे ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्जाच्या प्रिंट मिळतील तसेच कोणतेही माहितीपत्रक प्रिंट करण्याची सोय उपलब्ध तसेच सरकारी योजना आणि शालेय / कॉलेज आणि शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे आपले हक्काचे ठिकाण आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र नक्कीच एकदा भेट द्या. तसेच नवीन नवीन नोकरीचे अपडेट साठी आपण (naukri.surreta.com) वर सुद्धा भेट देऊ शकता किंवा मोबाईल अँप डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करावे Surreta Naukri