पीएम किसान PM Kisan स्टेट्स कसा बघावा आणि पैसे अकाऊंटला का आले नाहीत ?

PM Kisan

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) ही भारत सरकारच्या महत्त्वाच्या योजनांपैकी एक आहे. या योजनेंतर्गत, २ हेक्टर (४.९ एकर) पेक्षा कमी जमीन असलेल्या लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करते (PM Kisan). या योजनेंतर्गत सर्व शेतकऱ्यांना किमान उत्पन्न आधार म्हणून प्रतिवर्षी रु. ६,०००/- रुपये मिळतात (PM Kisan). १ डिसेंबर २०१८ पासून राबविण्यात आलेली ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला प्रति वर्ष रु. ६,०००  तीन हप्त्यांमध्ये दिले जातात आणि मदतीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. म्हणजेच दर ४ महिन्यांनी २ हजारांची मदत शेतकऱ्याला दिली जात आहे.

PM Kisan List शेतकरी योजनेचा ११ व हफ्ता जवळपास सर्व शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला आहे पण काही लोकांचे एक पेक्षा जास्त खाते असल्यामुळे काही तांत्रिक बाबी कडे लक्ष द्यावे लागणार आहे तेच या व्हिडीओ मध्ये सांगितले आहे. यासाठी पुढील पानांवर दिल्येल्या लिंक द्वारे आपण आपले पीएम किसानचे स्टेट्स बघू शकतात त्यामध्ये सुद्धा आपल्याला आपल्या बँकेचे शेवटचे ४ अक्षर दिसतात. किंवा आपण आधार वेबसाईट वर जाऊन आपले मोबाईल आणि आधार द्वारे कोणते बँक खाते लिंक आहे चेक करू शकता.

पीएम किसान योजने अंतर्गत वर्षाकाठी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात आणि यामध्ये सर्वात मोठा बदल आता योजनेअंतर्गत करण्यात आलेला आहे. तो म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांना केवायसी करणे बंधनकारक आहे आणि याची शेवटची मुदत ही केंद्राने जाहीर केलेले आहे. या तारखेच्या आत केवायसी करणं बंधनकारक आहे. आणि याच बरोबर जे अपात्र शेतकरी होते अशा अपात्र सर्व शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. 

पीएम किसान लिंक : https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus.aspx

PM Kisan

आधार बँक लिंक स्टेट्स : https://resident.uidai.gov.in/bank-mapper

PM Kisan

हेही वाचा : पीएम किसानची (PM KISAN) लाभार्थी यादी जाहीर आपले नाव बघून घ्या.

खालील उच्च आर्थिक श्रेणीतील व्यक्ती या योजनेच्या लाभासाठी पात्र असणार नाहीत.

  • सर्व संस्थात्मक जमीनधारक
  • संवैधानिक पद धारण करणारे / केलेले आजी व माजी व्यक्ती.
  • आजी / माजी मंत्री / राज्यमंत्री, आजी / माजी खासदार / राज्यसभा सदस्य, आजी / माजी विधानसभा / विधान परीषद सदस्य, आजी / माजी महानगरपालीकेचे महापौर, आजी / माजी जिल्हा परीषदेचे अध्यक्ष.
  • केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी / कर्मचारी, शासन अंगीकृत निमशासकीय संस्थांच्या अखत्यारीतील कार्यालयांमधील आणि स्वायत्त संस्थांचे सर्व अधिकारी/कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नियमीत अधिकारी/कर्मचारी. चतुर्थश्रेणी / गट ड वर्ग कर्मचारी वगळून
  • सर्व निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन रू. १०,०००/- किंवा त्यापेक्षा जास्त आहे चतुर्थश्रेणी / गट ड वर्ग कर्मचारी वगळून
  • मागील वर्षात आयकर भरलेल्या सर्व व्यक्ती.
  • नोंदणीकृत व्यवसायिक डॉक्टर, वकील, अभियंता, सनदी लेखापाल (C.A), वास्तुशास्त्रज्ञ, इ. क्षेत्रातील व्यक्ती.

 

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा पीएम किसान PM Kisan स्टेट्स कसा बघावा आणि पैसे अकाऊंटला का आले नाहीत ? या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

आपल्याला विविध प्रकारच्या फॉर्म आणि त्यांची माहिती पाहिजे असल्यास आपण आपल्या जवळच्या सुरेटा नोकरी मदत केंद्र (center.surreta.com) मध्ये सुद्धा भेट देऊ शकता, आपल्याला सुरेटा नोकरी मदत केंद्र मध्ये सर्व प्रकारचे ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्जाच्या प्रिंट मिळतील तसेच कोणतेही माहितीपत्रक प्रिंट करण्याची सोय उपलब्ध तसेच सरकारी योजना आणि शालेय / कॉलेज आणि शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे आपले हक्काचे ठिकाण आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र नक्कीच एकदा भेट द्या. तसेच नवीन नवीन नोकरीचे अपडेट साठी आपण (naukri.surreta.com) वर सुद्धा भेट देऊ शकता किंवा मोबाईल अँप डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करावे Surreta Naukri