Police Admit Card | महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीचे प्रवेशपत्र उपलब्ध ? फिजिकल ला जाताना सोबत घेऊन जाण्यास विसरू नका...

advertisement
Police Admit Card
advertisement

Police Admit Card | राज्यात मागील काही वर्षात रखडून राहिलेली पोलीस भरती काही मागील महिन्यात जाहिरात करण्यात आली आणि यासाठी लाखो उमेदवारांनी ऑनलाईन स्वरुपात अर्ज केले आहेत. महाराष्ट्र राज्य सरकार पोलीस भरतीसाठी १८ हजार पेक्षा जास्त पदांची भरती करणार आहे. या भरतीसाठी राज्यभरातून लाखो उमेदवार सराव आणि अभ्यास करत आहेत. यासाठी दि. ०९ नोव्हेंबर २०२२ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली होती ते दि. ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत होती पण विविध तांत्रिक अडचणी मुळे सदरील अर्ज करण्याची शेवट तारखेत पुन्हा वाढ करून दि. १५ डिसेंबर २०२२ पर्यंत करण्यात आली यामध्ये तब्बल १८ लाखापेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले आहेत आणि त्याचे शुल्क भरणा केले आहेत. म्हणजेच एका पदासाठी सरासरी १०० लोकांनी अर्ज केला आहे. येत्या काही दिवसांत पोलिस भरतीसाठी शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. शारीरिक चाचणी साधारण ०२ जानेवारी २०२३ पासून अपेक्षित आहे. पण त्याआधी या परीक्षेचे प्रवेशपत्र Police Admit Card कसे डाउनलोड करून प्रिंट करायचे हे जाऊन घेऊयात.

शारीरिक चाचणीचे स्वरूप कसे असेल 

Police Admit Cardपोलीस कॉन्स्टेबल पदासाठी शारीरिक चाचणी एकूण ५० गुणांची असेल. यामध्ये १६०० मीटर धावणे (२० गुण), १०० मीटर धावणे (१५ गुण), शॉट पुट (गोळाफेक) (१५ गुण) एकूण ५० गुण पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी ८०० मीटर धावणे (२० गुण) यांचा समावेश आहे. १०० मीटर धावणे (१५ गुण), शॉट पुट (गोळाफेक)(१५ गुण) एकूण ५० गुण असतील. तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष) पदासाठीची शारीरिक चाचणी एकूण १०० गुणांची असेल. यामध्ये पुरुष उमेदवाराला ५ किमी धावणे (५० गुण), १०० मीटर धावणे (२५ गुण), शॉट पुट(गोळाफेक) (२५ गुण) आसे एकूण १०० गुण असतील. शारीरिक चाचणीत किमान ५०% गुण मिळवणारे उमेदवार संबंधित श्रेणीतील जाहिरात केलेल्या रिक्त जागांसाठी १:१० च्या प्रमाणात १०० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी पात्र असतील सदरील माहिती आणि पूर्ण अपडेट हे आपल्याला सदरील संकेतस्थळावर उपलब्ध आहेत आपण अधिक माहिती साठी अधिकृत संकेतस्थळावरून माहिती घ्यावी.

उमेदवारांनी परीक्षेच्या तारखेला त्यांचे शारीरिक चाचणी प्रवेशपत्र Police Admit Card परीक्षा केंद्रावर आणणे आवश्यक आहे. महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर शारीरिक चाचणी प्रवेशपत्र Police Admit Card डाउनलोड करण्यासाठी पुढील पद्धतीने प्रोसेस करावी. आणि आपले प्रवेशपत्र Police Admit Card डाउनलोड करून घ्यावे. 

Police Admit Card हॉल तिकीट कसे डाउनलोड करावे ?

  • सर्वप्रथम https://policerecruitment2022.mahait.org/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. 
  • महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल फिजिकल टेस्ट / ग्राउंड टेस्ट प्रवेशपत्र २०२२ Police Admit Card शोधावे जे लवकरच उपलब्ध होईल. 
  • तपशीलवार माहिती भरावी म्हणजे आपला युजर आयडी किंवा इमेल आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करावे.
  • लॉगिन केल्यानंतर, तुमचे हॉल तिकीट Police Admit Card डिस्प्ले होईल. 
  • नंतर त्या पुढे दिसणारे प्रिंट बटन दाबून आपण ते A4 साईज वर ठळक दिसेल असे प्रिंट करून घ्यावे. किंवा आपण त्याचे पीडीएफ सुद्धा डाउनलोड करून घेऊ शकता.
  • सदरील प्रवेशपत्रवर Police Admit Card नमूद आपली माहिती / तपशील तपासून घ्यावे तसेच काही तक्रार असल्यास संबंधित संकेतस्थळावर असलेले संपर्क क्रमांक किंवा इमेल वर तशी सूचना द्यावी आणि होत असल्यास बदल करून घ्यावा.

लेखी चाचणीचे स्वरूप कसे असेल 

९० मिनिटांत पूर्ण करण्यासाठी १०० वस्तुनिष्ठ प्रश्नांची लेखी परीक्षा होईल आणि PST फेरी ५० गुणांची असेल आणि पुढील निवड प्रक्रियेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदारांना परीक्षेत किमान ५०% गुण मिळवावे लागतील. लेखी परीक्षेचा कालावधी ९० मिनिटे असेल आणि ती मराठी भाषेत घेतली जाईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे असतील. चुकीच्या उत्तरासाठी गुण कापले जाणार नाहीत. परीक्षा मराठीतूनच घेतली जाईल. परीक्षेचा एकूण कालावधी १:३० तासांचा आहे. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुणाचे १०० प्रश्न असतील. पोलीस भारती २०२२ च्या प्रश्नपत्रिकेत चार वेगवेगळे विभाग असतील.

प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी अधिकृत लिंकhttps://policerecruitment2022.mahait.org/Forms/Home.aspx

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा Police Admit Card | महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीचे प्रवेशपत्र उपलब्ध ? फिजिकल ला जाताना सोबत घेऊन जाण्यास विसरू नका... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.