पुणे महानगरपालिका अंतर्गत जनतेसाठी या 25 योजनांची यादी जाहीर | कोणाला किती मिळणार अनुदान जाणून घ्या इथे...

PMC Yojana

PMC Yojana : महिला व बाल कल्याण योजना, मागासवर्गीय कल्याणकारी योजना, युवक कल्याणकारी योजना दिव्यांग कल्याणकारी योजना या योजनांअंतर्गत युवक, युवती, महिला, पुरुषांकडून खालील योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणेत येत आहे.

 1. अपंग (दिव्यांग) व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य : पुणे मनपा (PMC Yojana) हद्दीतील अपंगांना (दिव्यांग) स्वयंरोजगार करणेसाठी रू.१५०००/- अर्थसहाय्य दिले जाईल.
 2. अपंग (दिव्यांग) व्यक्तींना अल्पकालिन व्यवसाय प्रशिक्षण घेण्यासाठी अर्थसहाय्य : ज्या अपंग (दिव्यांग) व्यक्तिंना समाज विकास विभागामार्फत सुरू असलेल्या व्यवसाय प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण घेणे अडचणीचे असल्यास शासनमान्य अधिकृत संस्थेत प्रवेश घेतला असेल अशा संस्थेस जास्तीत जास्त रक्कम रु. १०,०००/- किंवा संस्थेची प्रशिक्षणासाठी असणारी फी या पैकी जी रक्कम कमी असेल ती प्रशिक्षण खर्चापोटी देणेत येईल.

 3. अपंग (दिव्यांग) विद्याथ्र्यांना दीर्घ मुदतीचे शैक्षणिक चातांत्रिक अभ्यासक्रमासाठी अर्थसहाय्य : जे अपंग (दिव्यांग) विद्यार्थी इ. 10 वी व इ. १२ वी नंतर तांत्रिक, वैद्यकिय, इंजिनिअरींग, व्यवस्थापकीय, संगणकीय किंवा इतर उच्च शिक्षणासाठी किंवा विद्यापीठ मान्यता प्राप्त तांत्रिक कोर्सला प्रवेश घेतील अशा अपंग (निःसमर्थ) विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कालावधीत रू.२०,०००/- अर्थसहाय्य दिले जाईल. तसेच ज्या संस्थेत प्रवेश घेतला असेल ती संस्था शासनमान्य असणे बंधनकारक राहिल.

 4. अंध, अपंग (निःसमर्थ), विकलांग, मुकबधिर व्यक्तिंना कृत्रिम अवयव घेणेसाठी योजना : अंध, अपंग (दिव्यांग), व तत्सम अपंग (दिव्यांग) आपले विकलांग, मुकबधिर व्यक्तिंना दैनंदिन काम करताना उपयोगी पडणारे कृत्रिम साधनांसाठी रू.२०,०००/- अर्थसहाय्य देणेत येईल.

 5. महापालिका क्षेत्रातील मतिमंद व्यक्तींचा सांभाळ करणाऱ्या महापालिका हद्दीतील नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेस अथवा मतिमंद व्यक्तीच्या पालकांस अर्थसहाय्य : पुणे महानगरपालिका (PMC Yojana) परिसरात वास्तव्य असलेल्या किमान १५ मतिमंद व्यक्तीचा सांभाळ करण्याकरिता नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेस प्रति मतिमंद व्यक्तीकरिता रु.२४,०००/- वार्षिक अर्थसहाय्य अदा करण्यात येईल अथवा महापालिका हद्दीतील वास्तव्य असणाऱ्या मतिमंद व्यक्तीच्या पालकास आपल्या पाल्याच्या पालन-पोषण करण्याकरिता एकूण रू.२४,०००/- वार्षिक अर्थसहाय्य अदा करणेत येईल.

 6. दिव्यांग दिव्यांग, दिव्यांग- अव्यंग व्यक्तीच्या विवाहासाठी अर्थसहाय्य : किमान ४०% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांग वधू किंवा वराने दिव्यांगत्व नसलेल्या वधू किंवा वराशी विवाह केल्यास अथवा दिव्यांग नसलेल्या वधू किंवा वराने दिव्यांग असलेल्या वधू किंवा वराशी विवाह केल्यास किंवा दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांग वधू किंवा वराने दिव्यांगत्व असलेल्या वधू किंवा वराशी विवाह केल्यास विवाहासाठी रू. ३०,०००/- एकदाच अर्थसहाय्य देण्यात येईल. विवाहाच्या तारखे | पासून एक वर्षांच्या आत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

 7. दिव्यांग व्यक्तींनी स्थापित केलेल्या कला पथकास वाद्य खरेदीसाठी अर्थसहाय्य : दिव्यांग व्यक्तीनी स्थापित केलेल्या कला पथकास रु. ५० हजार पर्यंत एकदाच अर्थसहाय्य देणे आहे. कलापथकामध्ये किमान ५ सदस्य असणे आवश्यक आहे.

 8. दिव्यांग व्यवसाय गटांनी सुरू केलेल्या व्यवसायाच्या वृद्धी करिता अर्थसहाय्य : व्यवसाय वृद्धी होणे करिता भांडवली खर्चासाठी रकम रु. २५ हजार पर्यंत अर्थसहाय्य देणेत येईल. दिव्यांग बचत गटांतील ५ सदस्यांनी एकत्र येवून व्यवसाय गट स्थापन केला असणे आवश्यक आहे.

 9. किमान ६०% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगात असलेल्या दिव्यांग व्यक्तींना वार्षिक अर्थसहाय्य : पुणे महानगरपालिका (PMC Yojana) हद्दीत राहणाऱ्या हद्दीतील कार्यात्मक / क्रियात्मक दिव्यांगत्व (अंधत्व, अल्पदृष्ठ, कर्णबधीर (बहिरेपण व कमी ऐकू येणे), लोकोमोटर डिसजबिलि ठेंगुपणा, इन्टेलेक्च्युअल डिसअबिलिटी, ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर, सेरेब्रल पाल्सी, मस्क्यूलर डिस्ट्रॉफी, दीर्घकालीन मज्जासंस्था विकार, विशिष्ट शैक्षणिक अपंगत्व, कुष्ठपिडीत, मल्टिपल स्केलेरोसिस, संभाषण व भाषा अपंगत्व, थैलासेमिया, हिमोफिलीया, सिकल सेल डिसीज, कर्णबधीर अंधत्व, यांसह विविध प्रकारचे अंधत्व, अॅसिड हल्ला झालेली व्यक्ती, पार्किन्सन्स डिसीज) असलेल्या व्यक्तीस दरमहा रक्कम रु. २०००/- प्रमाणे वार्षिक रक्कम रू. २४,०००/- अर्थसहाय्य देणेत येईल.

 10. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता सायकल सुविधा : फक्त मागासवर्गीयांसाठी सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात किमान इयत्ता ११ वी तसेच त्या पुढील वर्गात मान्यता प्राप्त कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना अगोदरचे परिक्षेमध्ये ५०% गुण मिळाले असल्यास तसेच घरापासून महाविद्यालयाचे अंतर २ कि.मी. पेक्षा जास्त असल्यास सायकल घेणेकरीता अर्थसहाय्य देणेत येते.

 11. परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विध्यार्थ्यांना अनुदान : पुणे महानगरपालिका (PMC Yojana) हद्दीतील त्या त्या आर्थिक वर्षात परदेशात उच्च शिक्षण (पदवी नंतरच्या वैद्यकीय / अभियांत्रिकी / संगणकीय / व्यवस्थापन / विधी/ वाणिज्य इ.) घेण्यासाठी जाणाऱ्या मागासवर्गीय पाच विद्यार्थ्यांना तसेच आर्थिक दुर्बल घटकातील पाच विद्याथ्र्यांना प्रत्येकी रक्कम रूपये दोन लाख एकदाच अर्थसहाय्य देण्यात येते.

 12. पुणे मनपातील घाणभत्ता मिळणाऱ्या मागासवर्गीय सेवकांचे मुलांसाठी अर्थसहाय्य : पुणे मनपातील घाणभत्ता मिळणाऱ्या मागासवर्गीय सेवकांचे मुलांसाठी (इ. ८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांना) शैक्षणिक अर्थसहाय्य देणेत येते.

 13. पुणे महानगरपालिका हद्दीतील कचरावेचक व बायोगॅस प्रकल्पावर काम करणारे तसेच कचऱ्याच्या संबंधीत काम करणाऱ्या सर्व असंघटीत कष्टकरी कामगारांच्या मुलांना शैक्षणिक साहित्यासाठी अर्थसहाय्य : पुणे महानगरपालिका हद्दीतील कचरा वेचक व बायोगॅस प्रकल्पावर काम करणारे तसेच कचऱ्याच्या संबंधित काम करणाऱ्या सर्व असंघटीत कष्टकरी कामगारांच्या मुलांना (इ. ८ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी) शैक्षणिक साहित्यासाठी अर्थसहाय्य देणेत येते.

 14. कमवा व शिका : सन २०२२ - २०२३ या शैक्षणिक वर्षात इ. ११ वी व त्यापुढील शिक्षण घेत असलेल्या गरजू विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत दरमहा शैक्षणिक अर्थसहाय्य देणेत येते. यासाठी मागील वर्षात ५०% गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

 15. स्वयंरोजगारासाठी अनुदान : १८ ते ४५ वयोगटातील स्त्री/पुरुषांना स्वतःचा स्वयंरोजगार सुरू करावयाचा असल्यास अथवा सुरू असलेल्या व्यवसाय वाढीसाठी एकदाच अर्थसहाय्य देणेत येते.

 16. व्यसन मुक्तीसाठी अर्थसहाय्य : पुणे मनपा (PMC Yojana) हद्दीतील १८ ते ४५ वयोगटातील व्यक्ती अंमली पदार्थांच्या आहारी गेल्यास त्यांना त्या पासून मुक्त करणेसाठी शासनमान्य अथवा मान्यता प्राप्त व्यसनमुक्ति केंद्रात उपचारासाठी रु. ७०००/- पर्यंत अनुदान देण्यात येते (फक्त मागासवर्गीयांसाठी)

 17. लाडकी लेक (मुलगी दत्तक) योजना : मुलगी जन्मास आल्यानंतर १ वर्षांचे आत लाभ देणेत येतो. या योजना अंतर्गत पालकाने लोकसहभागातून जमा केलेली अथवा स्वतःची रक्कम रु. १० हजार व पुणे महानगरपालिकेची रक्कम रु. २० हजार असे एकूण रक्कम रु. ३० हजार राष्ट्रीयकृत बँक / डाक विभागाकडील किसान विकास पत्र / दिर्घ मुदतीची गुंतवणूक योजना मध्ये मुलीच्या नावे दामदुप्पट योजनेत गुंतविणेत येईल. तसेच या योजना अंतर्गत Bफक्त एका मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असल्यास पालकाने लोकसहभागातून अथवा स्वतःची जमा केलेली रक्कम रु. १० हजार व पुणे महानगरपालिकेचा हिस्सा रक्कम रु. २० हजाराच्या दुप्पट (२. रु. ४० हजार) असे एकूण रक्कम रु. ५० हजार राष्ट्रीयकृत बँक / डाक विभागाकडील किसान विकास पत्र / दिर्घ मुदतीची गुंतवणूक योजना मध्ये मुलीच्या नावे दामदुप्पट योजनेत गुंतविणेत येईल.

 18. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या कुटुंबांना प्रोत्साहनपर योजना :

  मुलगा नसताना एक वा दोन मुलींवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली असल्यास एकच मुलगी असेल तर तिच्या नावे रक्कम रु. १०,०००/- व दोन मुली असतील तर प्रत्येकी रक्कम रू. ५०००/- युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया मध्ये गुंतविण्यात येतील. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर १ वर्षांचे आत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

 19. विधवा महिलांना अर्थसहाय्य : घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यास त्याचे विधवा पत्नीस रू.१५,०००/- अनुदान (एकदाच) देणेची योजना आहे. मृत व्यक्तिचे वय १८ ते ६५ वर्षाच्या दरम्यान असावे. मृत्यू झाल्यानंतर २ वर्षाच्या आत अनुदानाचा अर्ज सादर करणे बंधनकारक राहील.

 20. डॉ. बाबासाहेब आंबेडकर १२५ व्या जयंतीनिमित्त माता रमाई भीमराव आंबेडकर योजनेंतर्गत गवनि घोषित व शहरी गरीब योजनेतील पत्र ठरणाऱ्या विधवा, निराधार महिलांसाठी प्राथमिक आरोग्य संगोपन करीत अर्थसहाय्य : केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत लाभ घेत नसलेल्या लाभार्थ्यांना दरमहा रक्कम रू.१०००/- प्रमाणे वार्षिक रक्कम रू. १२०००/- देण्यात येईल.

 21. माता रमाई स्वावलंबन योजनेंतर्गत सर्व स्तरातील विधवा, परितकत्या, निराधार महिलांना प्राथमिक आरोग्य संगोपन करीता अर्थसहाय्य : केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व संजय गांधी सर्व निराधार अनुदान योजना अंतर्गत लाभ घेत नसलेल्या लाभार्थ्यांना दरमहा रक्कम रू.१०००/- प्रमाणे वार्षिक रक्कम रु. १२०००/- देण्यात येईल...

 22. झोपडी दुरुस्ती : पुणे मनपा हद्दीतील नागरिकांना झोपडी दुरूस्तीसाठी रु.१०,०००/- पर्यंत अनुदान दिले जाते. (फक्त मागासवर्गीयांसाठी)

 23. वैयक्तिक नळ कनेक्शन : पुणे मनपा हद्दीतील नागरिकांना नळ कनेक्शनसाठी रु.५०००/- पर्यंत अनुदान दिले जाते. (फक्त मागासवर्गीयांसाठी)

 24. वैयक्तिक वीज कनेक्शन : पुणे मनपा हद्दीतील नागरिकांना विज कनेक्शनसाठी रू.५०००/- अनुदान दिले जाते. (फक्त मागासवर्गीयांसाठी)

 25. वैयक्तिक शौचालय बांधणे : पुणे मनपा हद्दीतील नागरीकांना वैयक्तिक शौचालय बांधणेकरीता रु. १५,०००/- पर्यंत अनुदान दिले जाते. (फक्त मागासवर्गीयांसाठी)

PMC Yojana

PMC Yojana : वरील अ. क्र. २२ ते २५ या योजनांची अंमलबजावणी क्षेत्रिय कार्यालयामार्फत केली जाईल.

उपरोक्त योजनांचे अर्ज दि. २४ एप्रिल २०२३ ते दि. ३० जून २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने dbt.punecorporation.org या संकेतस्थळावरती भरणेत यावेत. तसेच या बाबतचा तपशील व अटी व शर्ती या पुणे महानगरपालिकेच्या dbt.punecorporation.org या संकेतस्थळावरती बघण्यात यावे. अधिक माहितीसाठी संपर्क क्र. १८००१०३०२२२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा पुणे महानगरपालिका अंतर्गत जनतेसाठी या 25 योजनांची यादी जाहीर | कोणाला किती मिळणार अनुदान जाणून घ्या इथे... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.