PM Kisan Yojna | तब्बल १० कोटीचा टप्पा ओलांडला पीएम किसान योजनेने

PM Kisan Yojna

PM Kisan Yojna | पीएम-किसान या योजनेचा १० कोटी शेतकऱ्यांनी लाभ घेतल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने सोमवारी (ता.21) दिली. २०१९ च्या पहिल्या हप्त्यानंतर आत्तापर्यंत लाभार्थी संख्येत तिपट्ट वाढ झाली.

पीएम-किसान या योजनेचा (P Kisan Scheme) १० कोटी शेतकऱ्यांनी लाभ घेतल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने (Agriculture Department) सोमवारी (ता.21) दिली. २०१९ च्या पहिल्या हप्त्यानंतर आत्तापर्यंत लाभार्थी संख्येत तिपट्ट वाढ झाली. २०१९ साली योजनेचा लाभ ३.१६ कोटी शेतकऱ्यांनी घेतला होता. आत्ता मात्र या योजनेने १० कोटीचा टप्पा ओलांडल्याचा दावा केंद्रीय कृषी मंत्रालयाने केला.

PM Kisan Yojna | तब्बल १० कोटीचा टप्पा ओलांडला पीएम किसान योजनेने

PM Kisan Yojna

पीएम किसान योजना फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेत केंद्र सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यात ६ हजार रुपयांची मदत करते. कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मात्र सरकारची आकडेवारी खोटी असून प्रत्येक हप्त्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या कमी झाली आहे, असा आरोप केला.

कृषी मंत्रालयानुसार, "पीएम किसान योजनेत ३ वर्षात ३ पट्टीने वाढ झाली आहे. त्यामुळे १० कोटी लाभार्थी शेतकऱ्यांचा टप्पा पीएम किसान योजनेने गाठला. पहिल्या हप्त्याच्या वेळी लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या ३.१६ कोटी होती.

"पीएम किसान योजनेचे तीन वर्षे यशस्वी ठरले आहेत. कोट्यावधी गरजू शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर २ लाख कोटी रुपये जमा केले आहेत. ज्यामध्ये १.६ कोटी रुपये कोव्हिड-१९ च्या लॉकडाउन दरम्यान पाठवले आहेत, असाही दावा केंद्रीय कृषी मंत्रालयाने केला.

कृषी मंत्रालयाने सांगितले की, "लवकरच पीएम किसान योजनेचा १२ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. पीएम किसान योजनेमुळे दर चार महिन्याला शेतकऱ्यांच्या थेट मदत मिळाली. ही योजना देशातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे. पीएम किसान ही जगातील सर्वात मोठी अशी डीबीटी योजना आहे."

"कुठल्याही मध्यस्थी विना पीएम किसान योजनेचा लाभ पारदर्शक पद्धतीने कोट्यावधी शेतकऱ्यांपर्यंत पोहचला. पीम किसान योजनेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांचे ई-केवायसी आणि आधार पेमेंटसाठी (एपीबी) वापरून पेमेंट सुरू केल्याचेही कृषी मंत्रालयाने सांगितले.

भारत सरकारकडे केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा भारतातील नागरिकांसाठी एकाच वेळी अनुदानित सामाजिक कल्याण आणि सामाजिक सुरक्षा योजना आहेत. संपूर्णपणे केंद्र सरकारद्वारे अर्थसहाय्यित योजनांना "केंद्रीय क्षेत्र योजना" (CS) म्हटले जाते, तर प्रामुख्याने केंद्राद्वारे निधी उपलब्ध करून दिलेल्या आणि राज्यांद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजनांना "केंद्रीय प्रायोजित योजना" (CSS) म्हणतात. 2022 च्या भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्पात, 740 केंद्रीय क्षेत्र (CS) योजना आहेत. ६५ केंद्र प्रायोजित योजना (CSS).

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा PM Kisan Yojna | तब्बल १० कोटीचा टप्पा ओलांडला पीएम किसान योजनेने या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

आपल्याला विविध प्रकारच्या फॉर्म आणि त्यांची माहिती पाहिजे असल्यास आपण आपल्या जवळच्या सुरेटा नोकरी मदत केंद्र (center.surreta.com) मध्ये सुद्धा भेट देऊ शकता, आपल्याला सुरेटा नोकरी मदत केंद्र मध्ये सर्व प्रकारचे ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्जाच्या प्रिंट मिळतील तसेच कोणतेही माहितीपत्रक प्रिंट करण्याची सोय उपलब्ध तसेच सरकारी योजना आणि शालेय / कॉलेज आणि शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे आपले हक्काचे ठिकाण आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र नक्कीच एकदा भेट द्या. तसेच नवीन नवीन नोकरीचे अपडेट साठी आपण (naukri.surreta.com) वर सुद्धा भेट देऊ शकता किंवा मोबाईल अँप डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करावे Surreta Naukri