NMMC Scholarship इयत्ता पहिली ते महाविदयालयातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

advertisement
NMMC Scholarship
advertisement

NMMC Scholarship | नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती योजना

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील गरीब व गरजू इयत्ता 1 ली ते महाविदयालयात शिक्षण घेत असलेल्या विदयार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती वितरण करणे ही योजना ऑनलाईन पध्दतीने दि.21/12/2022 पासुन राबविण्यात येत आहे.      

 • विधवा / घटस्फोटित महिलांच्या मुलांना तसेच मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.
 • आर्थिक व दुर्बल घटकातील शाळेत जाणाऱ्या इयत्ता 1 ली ते महाविद्यालयीन पर्यंतच्या विद्यार्थांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.
 • इयत्ता 1 ली ते महाविद्यालयीन पर्यंतच्या शिक्षणासाठी गुणवत्ता प्राप्त मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.
 • नवी मुंबई क्षेत्रातील स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील इयत्ता 1 ली ते महाविद्यालयीन शिक्षण घेणा-या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.
 • नवी मुंबई क्षेत्रातील मनपा आस्थापनेवरील सफाई कामगार व कंत्राटी पध्दतीवर असलेल्या कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.
 • नवी मुंबई क्षेत्रातील दगडखाण/बांधकाम/रेती/नाका कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.

अटी व शर्ती :-

 • विद्यार्थ्याला मागील वर्षाच्या वार्षिक परिक्षेत किमान 65% गुण किंवा "अ" श्रेणी मध्ये उत्तीर्ण असावा. (आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांकरीता)
 • विद्यार्थ्याला मागील वर्षाच्या परीक्षेत किमान 60% गुण किंवा "ब" श्रेणी मध्ये उत्तीर्ण असावा. (मागासवर्गीय लाभार्थ्यांकरीता)
 • नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत इयत्ता 1 ली ते 10 वी पर्यंतचे शिक्षण घेत असलेले विद्यार्थांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
 • ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश RTE अंतर्गत झालेला आहे, अशा विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येणार नाही.
 • विदयार्थ्यांचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असावे व आधारकार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे.
 • अर्जामध्ये विदयार्थ्यांचे बँक खाते क्रमांक व IFSC code चुकीचा आढळल्यास त्याची सर्वस्वी जवाबदारी लाभार्थ्यांवर राहील.
 • लाभार्थी कुटूंबाने या समान कारणांसाठी इतर कोणत्याही शासकीय / अशासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
 • एका कुटूंबातील फक्त दोन पाल्यांना या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येईल.
 • लाभार्थ्यांचे नमुंमपा क्षेत्रात किमान 3 वर्ष वास्तव्य असणे आवश्यक आहे.

NMMC Scholarship इयत्ता पहिली ते महाविदयालयातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

NMMC Scholarshipउक्त विविध घटकाअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या शिष्यवृत्ती योजना आवश्यक त्या कागदपत्रांसह  https:/www.nmmc.gov.in सदर संकेत स्थळावर  शिष्यवृत्ती योजनेचे ऑनलाईन अर्ज भरणे करिता सोय उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्यानुसार लाभार्थी स्वत: मोबाईल व्दारे किंवा संगणकावर सदरील अर्ज सादर करू शकतात. कोणत्याही परिस्थित ऑफलाईन अर्ज स्विकारण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.

सदर अर्ज भरतेवेळी ज्या लाभार्थ्यास काही अडचणी निर्माण होतात त्यांनी खाली नमुद केलेल्या आपल्या विभागाशी संबधीत समुहसंघटक यांच्या दुरध्वनीवर संपर्क करावा. शिष्यवृत्ती करीता ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 31 जानेवारी 2023 पर्यंत सायंकाळी 6:15 वाजेपर्यत कार्यरत राहील. त्यानंतर लाभार्थ्यांना अर्ज सादर करता येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. महानगरपालिका क्षेत्रातील गरजू लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा NMMC Scholarship इयत्ता पहिली ते महाविदयालयातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.