या नर्सिंग कोर्ससाठी आत्ताच करा अर्ज, राहिले फक्त शेवटचे तीनच दिवस...

GNM Admission 2023

GNM Admission 2023-24 | दिनांक 01.08.2023 पासून खालील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परिचर्या प्रशिक्षण संस्थामध्ये सुरु होणा-या सामान्य परचर्या व प्रसूतीशास्त्र अभ्यासक्रमाकरीता प्रशिक्षण घेऊ इच्छिणा-या महिला उमेदवारांकडून मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर संगणकीय (ऑनलाईन) पध्दतीने विहीत प्रपत्रांमध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत. http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन सेवा या सदरामध्ये GNM NURSING ADMISSION 2023 या शीर्षकाखाली प्रवेश प्रक्रीयेविषयी माहिती य वेळापत्रक दिनांक 13.06.2023 पासून उपलब्ध करुन देण्यात येईल यांची नोंद घ्यावी. ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि.15.06.2023 ते दि. 24.06.2023 आहे.

GNM Admission 2023

GNM Admission 2023 Mumbai : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

रुग्णालयाची यादी खालीलप्रमाणे :

  • रा. ए. रमा रुग्णालय, परेल, मुंबई 400012
  • लो. टि.म.स. रुग्णालय, सायन, मुंबई 400022
  • बा. य. ल. नायर धर्मा रुग्णालय, मुंबई सेंट्रल, मुंबई 400008
  • डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय, विलेपार्ले, मुंबई- 400 049
  • श्री हरिलाल भगवती रुग्णालय, बोरीवली (पश्चिम), मुंबई - 400. 103.

निवड झालेल्या उमेदवारांना सामान्य परिचय व प्रसतिशास्त्र अभ्यासक्रमासोबत सार्वजनिक आरोग्य परिचर्या आणि प्रसुतीशास्त्र आंतरवासियतासहीत 3 वर्षे अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घ्यावे लागेल. ( अभ्यासक्रमाचा कालावधी व अभ्यासक्रमाचे विषय भारतीय परिचर्या परिषद व महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व परावैद्यक शिक्षण मंडळ यांच्या ठरावासपेक्ष) स्त्री उमेदवारांनी रुग्णालयांशी संलग्न असलेल्या निवासस्थानामध्ये (वसतीगृहामध्ये) रहाणे अनिवार्य आहे. विद्यावेतन दरमहा रु. 100-10-120 अधिक रु.340/- गणवेश भत्ता अधिक रु. 150/- भुलाई भत्ता अधिक मोफत वसतीगृह - निवासस्थान व मोफत भोजन या व्यवस्था आहेत.

शैक्षणिक अर्हता :-

उमेदवार महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाची उच्च माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10+2) अथवा समतुल्य परीक्षा शासनमान्य संस्थेतून प्राधान्याने जीवशास्त्र, रसायनशास्त्र. भौतिकशास्त्र (BIOLOGY, CHEMISTERY, PHYSICS) या शास्त्र विषयासह (PCB) कमीत कमी 40 टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वरीलप्रमाणे आवश्यक पात्रता धारण करणारे उमेदवार पुरेशा संख्येने उपलब्ध झाले नाहीत तर महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक परिक्षा मंडळाची कोणत्याही शाखेतील आणि कोणत्याही विषयातील उच्च माध्यमिक परिक्षा (10+2) कमीत कमी 40% गुणांनी उत्तीर्ण करणा-या खुला गटातील उमेदवारांचा व कमीत कमी 35 गुणांनी उत्तीर्ण होणा-या मागासवर्गीय गटातील उमेदवारांचा प्रवेशासाठी विचार करण्यात येईल.

GNM Admission 2023 Mumbai : अधिक माहिती वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा या नर्सिंग कोर्ससाठी आत्ताच करा अर्ज, राहिले फक्त शेवटचे तीनच दिवस... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.