MSEB Apprenticeship | पुणे महावितरण मध्ये अप्रेंटीस पदाच्या ५५ जागा

MSEB Apprenticeship
advertisement

MSEB Apprenticeship | शिकाऊ उमेदवार अधिनियम १९६१ अन्वये एका वर्षा (सन २०२२-२३) करीता आय. टी. आय शिकाऊ उमेदवार म्हणून भरती प्रक्रिया संबंधी महावितरण कार्यालय राजगुरुनगर विभाग यांच्या अस्थापनेवरील वीजतंत्री २५ व तारतंत्री ३० या प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण ५५ जागा भरण्यासाठी एस.एस.सी. व शासकिय आय. टी. आय उत्तीर्ण (वीजतंत्री / तारतंत्री) NCVT अंतर्गत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे Designated Trade हा ELECTRICIAN / WIREMAN व Apprentices Training Period एका वर्षा करीता असुन वीजतंत्री / तारतंत्री यांच्या ५५ जागा भरावयाच्या आहेत.

MSEB Apprenticeship | पुणे महावितरण मध्ये अप्रेंटीस पदाच्या ५५ जागा या जागेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

MSEB Apprenticeship

राजगुरुनगर विभागिय कार्यालयाचा आस्थापना नोंदणी क्रं. E05202702197 असा आहे.

  1. शैक्षणिक अर्हता महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १०+२ यामधील माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली शासकिय (मान्यताप्राप्त) औदयोगिक प्रशिक्षण संस्थेमधुन वीजतंत्री / तारतंत्री व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  2. वयोमर्यादा सर्वसाधारण उमेदवारांसाठी ३० वर्ष, मागासवर्गीय उमेदवारासाठी ३५ वर्ष.
  3. प्रशिक्षण कालावधी १ वर्ष.
  4. विदयावेतन नियमाप्रमाणे.
  5. पद कमी जास्त करण्याच्या व भरती प्रक्रियेशी निगडीत असलेले सर्व अधिकार व्यवस्थापन राखुन ठेवीत आहे.
  6. सदर भरती हि फक्त राजगुरुनगर विभागापुरती मर्यादीत असेल.
  7. एस.एस.सी. उत्तीर्ण गुणपत्रिका व सदर प्रमाण पत्राची साक्षांकित प्रत.
  8. शासकिय आय. टी. आय उत्तीर्ण प्रमाणपत्र (चार सेमीस्टर गुणपत्रिका) मेरीटनुसार निवड करण्यात येईल.
  9. उमेदवारांने मागास प्रवर्गात अर्ज केला असल्यास जात प्रमाणपत्राची छायांकीत प्रत.
  10. भरती प्रक्रिये दरम्यान उमेदवाराने राजकीय दबाव आणल्यास आपली उमेदवारी रद्द समजण्यात येईल याची नोंद घ्यावी.

उमेदवारांनी ऑनलाईन (Online) अर्ज करतांना (www.apprenticeshipindia.org) पोर्टलवर मुळ प्रमाणपत्र स्कॅन करून योग्य रितीने अपलोड करणे बंधनकारक असून त्याची एक प्रत कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय मानव संसाधन विभाग, राजगुरुनगर येथे दि. ०७/१२/ २०२२ पर्यंत संध्याकाळी ५.३० पर्यंत सादर करावे.

वरील कालावधीत ऑनलाईन (Online) अर्ज व (Online) अर्जाची प्रत सादर न केल्यास अशा अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच उमेदवारांनी अर्ज व मुळ कागदपत्रे पडताळणीसाठी दि. ०८/१२/२०२२ व दि. ०९/१२/२०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय म.रा.वि.वि.के.(MSCEB) मर्या., शामली बिल्डींग, वाडा रोड, राजगुरुनगर ता. खेड, जि. पुणे येथे हजर रहावे. शिकाऊ उमेदवाराची निवड झाल्यानंतर काही कारणास्तव अप्रेंटिस बोर्ड मुंबई यांच्याकडून उमेदवाराची नोंदणी नाकारल्यास आपली शिकाऊ उमेदवारी आपोआप रद्द होईल याची नोंद घ्यावी.

advertisement

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा MSEB Apprenticeship | पुणे महावितरण मध्ये अप्रेंटीस पदाच्या ५५ जागा या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

आपल्याला विविध प्रकारच्या फॉर्म आणि त्यांची माहिती पाहिजे असल्यास आपण आपल्या जवळच्या सुरेटा नोकरी मदत केंद्र (center.surreta.com) मध्ये सुद्धा भेट देऊ शकता, आपल्याला सुरेटा नोकरी मदत केंद्र मध्ये सर्व प्रकारचे ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्जाच्या प्रिंट मिळतील तसेच कोणतेही माहितीपत्रक प्रिंट करण्याची सोय उपलब्ध तसेच सरकारी योजना आणि शालेय / कॉलेज आणि शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे आपले हक्काचे ठिकाण आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र नक्कीच एकदा भेट द्या. तसेच नवीन नवीन नोकरीचे अपडेट साठी आपण (naukri.surreta.com) वर सुद्धा भेट देऊ शकता किंवा मोबाईल अँप डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करावे Surreta Naukri