MPSC चा निकाल जाहीर | तब्बल ५८० उमेदवारांनी मारली बाजी; PDF उपलब्ध पहा लगेच...

advertisement
MPSC Result
advertisement

MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMMISSION (MPSC Result)

MAHARASHTRA CIVIL ENGINEERING SERVICES MAIN EXAMINATION - 2021

विषय :- महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा - २०२९ निकालाबाबत.....

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २९ ऑक्टोबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२१ चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे...

MPSC Result पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

उपरोक्त निकालानुसार मुलाखतीसाठी प्रथमदर्शनी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या परीक्षेच्या आवेदनपत्रातील दाव्याच्या पृष्ठर्थ मुलाखतीच्यावेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रांवरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून मुलाखतीस बोलविण्यात येत आहे. उमेदवारांनी आवेदन पत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक मूळ प्रमाणपत्रांची पूर्तता मुलाखतीचे वेळी न केल्यास, तसेच अधिसूचनेतील तरतुदीनुसार दावे तपासताना व अन्य कारणांमुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येईल.

प्रस्तुत मुख्य परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे (SMS) कळविण्यात येईल. प्रस्तुत मुख्य परीक्षेमधून मुलाखतीकरीता अर्हताप्राप्त न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची फेरपडताळणी करावयाची आहे, अशा उमेदवारांनी गुणपत्रक प्रोफाइलमध्ये प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून १० दिवसांच्या आत आयोगाकडे ऑनलाईन पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. (आयोगाच्या संकेतस्थळावरील सर्वसाधारण सूचनेतील सूचना क्र. ६.४ कृपया पहावी.)

प्रस्तुत परीक्षेच्या मुलाखतीकरीता बोलविण्यात येणाऱ्या खेळाडू उमेदवारांबाबत करावयाच्या कार्यवाही संदर्भात मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेतील ४.१३ नुसार खेळाडूसंदर्भात शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार कार्यवाही अनुसरण्यात येईल. प्रस्तुत परीक्षेचा निकाल आरक्षणाच्या / समांतर आरक्षणाच्या / इतर मुद्यांसंदर्भात विविध मा. न्यायालयात / मा.न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिध्द करण्यात आला आहे.

मुलाखतीचा सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.

MPSC Resultमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ही भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 अन्वये अर्जदारांच्या गुणवत्तेनुसार आणि नियमांनुसार महाराष्ट्र राज्यासाठी गट 'अ' आणि गट 'ब' नागरी सेवकांची निवड करण्यासाठी तयार केलेली संस्था आहे.  MPSC चे मुख्य कार्यालय महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई येथे आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ही भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 अन्वये विविध सरकारी पदांसाठी योग्य उमेदवार उपलब्ध करून आणि त्यांना विविध सेवाविषयक बाबींवर सल्ला देऊन महाराष्ट्र सरकारचे कामकाज सुरळीत आणि कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी स्थापन केलेली एक घटनात्मक संस्था आहे. जसे की भरती प्रक्रियेचे नियम, पदोन्नती, बदल्या आणि शिस्तभंगाची कारवाई इ.

MPSC च्या निकालाचे PDF पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा MPSC चा निकाल जाहीर | तब्बल ५८० उमेदवारांनी मारली बाजी; PDF उपलब्ध पहा लगेच... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.