महाराष्ट्रात आणखी किती दिवस मुसळधार कोसळणार ? हवामान खात्याने थेट तारीखच सांगितली...

Rain Update

Maharashtra Rain Update : गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. वास्तविक 10 तारखेपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र गणरायाच्या आगमनाबरोबरच महाराष्ट्र राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात झाली. ज्या दिवशी गणरायाचे आगमन झाले, त्यादिवशी पाऊस कमी होता, मात्र तेव्हापासून दिवसेंदिवस पावसाचा जोर वाढतच गेला. त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आवाज उठवला आहे. दुष्काळाच्या उंबरठ्यावर असलेल्या महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला आहे. पण महाराष्ट्रात हि बऱ्याच जिल्ह्यात आजून पावसाने काही तोंड दाखवलेले नाही.

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात आणखी किती दिवस मुसळधार कोसळणार ? हवामान खात्याने थेट तारीखच सांगितली...

दरम्यान, भारतीय हवामान खात्याने पावसाच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा अपडेट दिला आहे. तुम्हाला माहिती आहेच की, गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे. नागपुरात ढग फुटल्यासारखा पाऊस झाला. नागपुरात शुक्रवारी आणि शनिवारी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्याचवेळी हवामान खात्याने आज पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आज महाराष्ट्राच्या सर्वच भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

विशेष म्हणजे आज नागपूर विभागालाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्यानुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र आहे. सिक्कीम ते मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या हंगामी प्रणालीमुळे राज्यात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. ही स्थिती राज्यात अतिवृष्टीसाठी अनुकूल आहे. विशेष म्हणजे या हवामान व्यवस्थेमुळे बुधवारपर्यंत राज्यभरात पाऊस सुरू राहणार आहे. 27 सप्टेंबरपर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आज नागपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून रत्नागिरी वगळता सर्वत्र यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Rain Update

हे सुद्धा वाचा : प्रती विद्यार्थ्यास प्रतिवर्षी मिळणार ३० ते ४० लाख रुपये | असा घ्या योजनेचा लाभ...

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा महाराष्ट्रात आणखी किती दिवस मुसळधार कोसळणार ? हवामान खात्याने थेट तारीखच सांगितली... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.