Mahamesh Yojna | या महामेष योजनेस अर्ज करण्याची उद्या आहे शेवट तारीख; आत्ताच करा अर्ज...

advertisement
Mahamesh Yojna
advertisement

Mahamesh Yojna | या योजने अंतर्गत देण्यात येणारे लाभ -

 • स्थायी आणि स्थलांतरीत पध्दतीने मेंढपालनासाठी पायाभूत सोई-सुविधेसाठी २० मेंढ्या + १ मेंढानर अशा मेंढी गटाचे ७५% अनुदानावर वाटप.

 • सुधारीत प्रजातीच्या नर मेंढ्याचे ७५% अनुदानावर वाटप करणे.,

 • मेंढी पालनासाठी पायाभुत सोई-सुविधा उपलब्ध करुण देण्यासाठी ७५% अनुदान.,

 • मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करुन देण्यासाठी ७५% अनुदान.

 • हिरव्या चार्‍याच्या मुरघास करण्या करीता गासड्या बांधण्याचे तंत्र खरेदी करण्यासाठी ५०% अनुदान

 • पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी ५०% अनुदान मिळणार.

Mahamesh Yojna | या योजनेचा अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी इथे क्लिक करा.

Mahamesh Yojna

आवश्यक कागदपत्राची यादी खालील प्रमाणे आहे.

 • आधार कार्ड
 • रेशन कार्ड
 • जातीचा दाखला (सक्षम अधिकार्‍यांचा)
 • मेंढी पालन करण्याची पद्धत किंवा स्वरूप व सध्या असलेल्या मेंढ्यांची संख्या (स्थलांतरित /फिरस्ती पद्धतीने किंवा एका ठिकाणी राहून स्थायी पद्धतीने) याबाबतचे संबंधीत पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुधन विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र (बंधपत्रामधील नमुना क्रमांक १ मध्येच सादर करावयाचा आहे)

 • रहिवासी दाखला (सक्षम प्राधिकारी) (बंधपत्रामधील नमुना क्रमांक २ मध्येच सादर करावयाचा आहे)

 • अपत्य दाखला (बंधपत्रामधील नमुना क्रमांक ३ मध्येच सादर करावयाचा आहे). १ मे २००१ नंतर तिसरे हयात अपत्य नसावे.

 • अर्जदाराचे शेतजमिनीचा अलीकडील तीन महिन्यातील ७/१२ उतारा किंवा अर्जदाराच्या नावे जमीन नसल्यास (कुटुंबियांपैकी) संमतीपत्र देणाऱ्या व्यक्तीच्या नावाच्या शेतजमिनीचा ७/१२ उतारा व १०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर संमतीपत्र (बंधपत्रामधील नमुना क्रमांक ४ मध्येच सादर करावयाचा आहे).

 • भाडेतत्वावर शेतजमीन घेतली असल्यास शेतजमीन मालकासमवेत केलेल्या भाडेकराराची सत्यप्रत (रु.१००/- स्टॅम्प पेपर वर नोटरी करून) (बंधपत्रामधील नमुना क्रमांक ५ मध्येच सादर करावयाचा आहे).

 • शेड बांधकामाचा लाभ घ्यावयाचा असल्यास, त्यासाठी स्वत:ची किमान १ गुंठा जागा उपलब्ध असल्याबाबत अलीकडील तीन महिन्यातील ७/१२ उतारा / मिळकत दाखला

 • बचतगटाचे सदस्य असल्याचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)

 • पशुपालक उत्पादक कंपनीचे सदस्य असल्याचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)

 • अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास)

 • महामंडळामार्फत शेळी मेंढी पालनाचे प्रशिक्षण घेतले असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र

 • स्वयंमघोषणा पत्र (बंधपत्रामधील नमुना क्रमांक ६ मध्येच सादर करावयाचा आहे)

अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती

 • अर्ज सादर करण्याचा कालावधी १५/११/२०२२ ते १०/१२/२०२२ पर्यंत
 • योजनेची पूर्ण माहिती या अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती याबाबतचा संपूर्ण तपशील त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

या योजनेविषयी संपूर्ण माहितीपत्रक वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा Mahamesh Yojna | या महामेष योजनेस अर्ज करण्याची उद्या आहे शेवट तारीख; आत्ताच करा अर्ज... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.