MahaCET Re Exam | या विद्यार्थ्यांना सीइटी परीक्षा देण्याची पुन्हा संधी ? काही तांत्रिक कारणामुळे परीक्षा देता आल्या नसतील तर पुन्हा परीक्षा होणार !

MahaCET Re Exam

MahaCET Re Exam | महासीइटी मध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेतल्या जातात या आधी जे वेळापत्रक नुसार परीक्षा झाल्या आहेत पण काही केंद्रावर तांत्रिक दोष किंवा बिघाड असल्या कारणाने काही विद्यार्थी या परीक्षा देण्यास मुकले आहेत त्यांच्या पुन्हा परीक्षा (MahaCET Re Exam) होणार आहेत. त्याचे प्रवेशपत्र आणि इतर महत्वाची सूचना अधिकृत संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात आलेली आहे याची पूर्ण माहिती आपण या लेखात बघणार आहोत तरी लेख सुरुवाती पासून शेवट पर्यंत वाचावा तसेच कामाचा असल्यास आणि आपल्या मित्रांची पण परीक्षा राहिली असल्यास (MahaCET Re Exam) त्यांना सुद्धा शेअर करावा. 

MAH- LL.B-5 वर्षे B.Ed.- M.Ed., B.P.Ed.. M.Ed. LL.B-3 वर्षे.B.A.-B.Sc.B.Ed. B.Ed. & B. Planning, MCA या परीक्षेची शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी वेबसाइटवर जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ऑनलाइन प्रवेश परीक्षा २ ते ५ ऑगस्ट २०२२ दरम्यान घेण्यात आली होती.

MahaCET सेलने त्या दिवशी आणि शिफ्ट नुसार सीइटीला बसलेल्या सर्व उमेदवारांच्या लॉगचे तपासले आहेत आणि निदर्शात आलेल्या बाबी पुढील प्रमाणे आहेत तसेच महत्वाच्या सूचना देखील दिलेल्या आहे.

  • काही केंद्रांवर सर्व्हरची समस्या होती आणि परीक्षेदरम्यान उमेदवारांच्या लॉग आउटच्या अनेक समस्या होत्या.
  • कॉम्प्युटर बंद होणे लाईट जाने किंवा लॉग आउट होणे यामुळे काही उमेदवारांना परीक्षेसाठी कमी वेळ मिळाला.
  • ज्या उमेदवारांना तीन किंवा जास्त वेळेस त्या अडचणींना सामोरे जावे लागले जसे कि संगणक बंद होणे किंवा लॉग आउट होणे आणि जे तांत्रिक आणि सर्व्हर समस्यांमुळे सर्व प्रश्न पूर्ण करू शकले नाहीत, अशा सर्व उमेदवारांना पुन्हा परीक्षा (MahaCET Re Exam)  देण्याची संधी देण्यात येणार आहे. यासाठी MahaCET सेलने पुन्हा वेळापत्रक जाहीर केले आहे.
  • काही उमेदवार ज्यांनी प्रवेशपत्र डाऊनलोड केले आणि वेळेत परीक्षा केंद्रावर सुद्धा उपस्थित होते पण तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा (MahaCET Re Exam) देऊ शकले नाहीत ते सुद्धा पुनर्परीक्षेसाठी (MahaCET Re Exam) पात्र मानले जातील.
    • केवळ वर नमूद केलेल्या उमेदवारांना सूचित करण्यात येते की, उमेदवारांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन, त्यांना दि. १८ ऑगस्ट २०२२ ते दि. २० ऑगस्ट २०२२ या कालावधीत पुनर्परीक्षेसाठी (MahaCET Re Exam) मोफत अर्ज करण्याची विनंती केली जात आहे. ज्या उमेदवारांनी पुनर्परीक्षेसाठी अर्ज केला आहे त्यांचाच पुनर्परीक्षेसाठी (MahaCET Re Exam) विचार केला जाईल आणि केवळ त्यांची हॉल तिकीटे त्यांच्या लॉगिनद्वारे ऑनलाइन तयार केली जातील.
    • वरील १ ते ४ प्रकरणांमध्ये उपस्थित न होणारे उमेदवार पुनर्परीक्षेसाठी पात्र मानले जाणार नाहीत.

वरील मुद्दे क्रमांक १ ते अंतर्गत येणाऱ्या उमेदवारांना ई-मेल आणि एसएमएसद्वारे याबद्दल माहिती दिली जाईल, त्यांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन संबंधित लिंक वर क्लिक करून पुनर्परीक्षेचा (MahaCET Re Exam) अर्ज भरावा. सदरील अर्ज हा दि. २० ऑगस्ट २०२२ रोजी संध्याकाळी ०५.०० वाजेपर्यंत करायचा आहे. सदरील अर्ज भरण्याच्या कालावधी आधी सर्व उमेदवारांनी परीक्षा साठी अर्ज करायचा आहे तसेच प्रवेशपत्र प्रिंट करून घ्यायचे आहे तसेच नमूद केलेल्या वेळेनुसार आणि वेळापत्रकानुसार केंद्र, ठिकाणी परीक्षेला बसण्याच्या शेवटच्या संधीसाठी उपस्थित राहणे ही पात्र उमेदवारांची जबाबदारी आहे.

अधिक माहितीसाठी आणि MahaCET Re Exam अर्ज करण्यासाठी

इथे क्लिक करा.

MahaCET Re Exam

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा MahaCET Re Exam | या विद्यार्थ्यांना सीइटी परीक्षा देण्याची पुन्हा संधी ? काही तांत्रिक कारणामुळे परीक्षा देता आल्या नसतील तर पुन्हा परीक्षा होणार ! या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

आपल्याला विविध प्रकारच्या फॉर्म आणि त्यांची माहिती पाहिजे असल्यास आपण आपल्या जवळच्या सुरेटा नोकरी मदत केंद्र मध्ये सुद्धा भेट देऊ शकता, आपल्याला सुरेटा नोकरी मदत केंद्र मध्ये सर्व प्रकारचे ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्जाच्या प्रिंट मिळतील तसेच कोणतेही माहितीपत्रक प्रिंट करण्याची सोय उपलब्ध तसेच सरकारी योजना आणि शालेय / कॉलेज आणि शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे आपले हक्काचे ठिकाण आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र नक्कीच एकदा भेट द्या.