MahaCET Admit Card परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध | या परीक्षेचे पण झाले प्रवेशपत्र उपलब्ध | लगेच डाऊनलोड करण्यासाठी लिंक उपलब्ध.
MahaCET Admit Card २०२२ मधील विविध परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची लिंक उपलब्ध झालेली असून आपण या लेखात महत्वाच्या सूचना आणि कसे डाऊनलोड करावे या बाबत जाणून घेणार आहोत. MahaCET Admit Card मध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेतल्या जातात या आधी जे वेळापत्रक जाहीर झाले होते त्यात सध्या तरी काही बदल न करता आहे तसेच विविध परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध होत आहेत. त्याआधी उमेदवार आणि परीक्षा सेंटर यांच्यासाठी काही महत्वाच्या सूचना आहेत त्या पुढील प्रमाणे असतील परीक्षा तारखा जाहीर | जाणून घ्या कधी मिळणार प्रवेशपत्र आणि कधी असणार परीक्षा.
MahaCET Admit Card एमएचटी-सीईटी २०२२ (तंत्रशिक्षण व कृषी शिक्षण)/ बी.एचएमसीटी/बी. एम.आर्च/एम.एचएमसीटी-सीईटी २०२२
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई या कक्षामार्फत तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी २०२२ (तंत्रशिक्षण व कृषी शिक्षण)/ बी.एचएमसीटी/ बी. प्लानिंग/ एमबीए / एमसीए / एम.आर्च/ एम.एचएमसीटी-सीईटी २०२२ या सामाईक प्रवेश परीक्षांचे आयोजन दिनांक ०२/०८/२०२२ ते २५/०८/२०२२ या कालावधीत करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने उपरोक्त सामाईक प्रवेश परीक्षेसाठी शुल्कासहीत अर्ज केलेल्या व परीक्षेस बसणाऱ्या उमेदवारांना खालील प्रमाणे महत्वाच्या सूचना देण्यात येत आहेत.
- उमेदवाराने प्रवेश पत्र (Hall Ticket) विहित मुदतीत अभ्यासक्रमाच्या संकेतस्थळावरून download करून त्याची Printout काढावी.
- प्रवेश पत्र (Hall Ticket) वरील परीक्षेचा दिनांक, परीक्षेची वेळ, परीक्षा केंद्राचा पत्ता, इत्यादी. बाबत काळजीपूर्वक वाचावे.
- परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्रावर Hall Ticket वर नमूद केलेल्या Gate Clouser वेळेआधी पोहोचण्याची दक्षता घ्यावी व योग्य ते नियोजन करावे.
- प्रवेशपत्रावर उपलब्ध करून दिलेल्या जागेत स्वतःचा Recent Passport Size Photo चिटकवावा.
- परीक्षेस जाताना प्रवेश पत्र (Hall Ticket) न विसरता सोबत घेवून जावे.
- परीक्षेस जाताना उमेदवाराने स्वतःचे मूळ ओळख प्रमाणपत्र (ID Proof) जसे कि, PAN Card /Aadhar Card / Passport, etc न विसरता सोबत घेवून जावे.
- प्रवेश पत्रावरील सूचनांचे न विसरता वाचन करून पालन करावे.
- परीक्षे दरम्यान कोणत्याही गैरप्रकारचा अवलंब करू नये.
- बाहेरगावावरून परीक्षेला येणाऱ्या उमेदवारांनी परीक्षेच्या दिवशी होणारी घाई व उशीर टाळण्यासाठी आधीच परीक्षाकेंद्रावर जाण्याचा मार्ग व सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था याचा अभ्यास करावा.
इतर महत्वाच्या सूचना
- विद्यापीठे आणि इतर राष्ट्रीय संस्थांद्वारे हि परीक्षा आयोजित असते.
- अनेक परीक्षा एकाच वेळी घेतल्या जात असल्याने सीईटी आणि इतर परीक्षांचा वेळापत्रक एकच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. MahaCET Admit Card सेल प्रस्तावित तारखेत बदल करणार नाही. उमेदवारांनी त्यांच्याद्वारे दिल्या जाणार्या परीक्षांमध्ये योग्य निवड करणे आवश्यक आहे.
- आवश्यकतेनुसार वेळापत्रकात बदल करण्याचा अधिकार सक्षम अधिकाऱ्याने राखून ठेवला आहे.
- सर्व अपडेट अभ्यासक्रमाच्या वेब पृष्ठावर पोस्ट केली जातील आणि अपडेट, सूचना आणि सूचनांसाठी नियमितपणे अभ्यासक्रमाची वेबसाइट तपासणे उमेदवारांना बंधनकारक असेल.
- एकदा भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही.
- उमेदवारांनी भरलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रत हार्ड आणि सॉफ्ट फॉरमॅटमध्ये ठेवावी
- * चुकीची माहिती दिल्याबद्दल उमेदवारांवर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई केली जाईल
- केंद्रीकृत प्रवेशासाठी उपलब्ध जागा फारच मर्यादित असल्याने आणि CET मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची संख्या मोठी असल्याने MahaCET Admit Card उमेदवारांना MahaCET Admit Card साठी नामांकित, सर्वोच्च मान्यताप्राप्त संस्था, NAAC मान्यताप्राप्त संस्थेत जागा सुरक्षित ठेवण्यासाठी अपेक्षित गुण मिळविणे आवश्यक आहे.
हेही वाचा : जेईई मेन परीक्षा प्रवेशपत्र २०२२ सत्र २ डायरेक्ट लिंक उपलब्ध ! आजच डाउनलोड करून घ्या आपले प्रवेशपत्र
सध्या उपलब्ध असलेले प्रवेशपत्र पुढील प्रमाणे आहेत.
SN | CET Name | Department | Link |
---|---|---|---|
1 | B.A.-B.Ed./B.Sc.- B.Ed. (Four Year Integrated Course ) | Higher Education | View Admit Card |
2 | MAH-LLB-3Yrs | Higher Education | View Admit Card |
3 | MCA | Technical Education | View Admit Card |
4 | B.Planning | Technical Education | View Admit Card |
5 | MAH-B.Ed.-M.Ed. (Three Year Integrated Course) | Higher Education | View Admit Card |
6 | MAH-BPED | Higher Education | View Admit Card |
7 | MAH-LLB-5 Yrs. (Integrated Course) | Higher Education | View Admit Card |
8 | MAH-M.Ed. | Higher Education | View Admit Card |
9 | MAH-MARCH | Technical Education | View Admit Card |
10 | MAH-MHMCT | Technical Education | View Admit Card |
अधिक माहितीसाठी आणि MahaCET Admit Card डाऊनलोड करण्यासाठी
इथे क्लिक करा
वरील लिंक काम करत नसल्यास आपण mahacet संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकता
हे सुध्दा वाचा