सौर कृषी पंप ऑनलाईन अर्ज सुरु | अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करू शकता अर्ज, लिंक उपलब्ध...

advertisement
Kusum Solar Yojana
advertisement

Kusum Solar Yojana Registration 2023 | कुसुम सोलर पंप योजना ऑनलाईन अर्ज भरणे सुरु. महाऊर्जामार्फत राज्यामध्ये महाकृषि ऊर्जा अभियान पीएम-कुसुम घटक-ब योजनेच्या पुढील टप्प्याअंतर्गत सौर कृषिपंपांकरिता शेतकऱ्यांना महाऊर्जाच्या ऑनलाईन पोर्टलवर अर्ज सादर करण्यासाठी दि. १७ मे २०२३ रोजी पासून सुरु करण्यात येत आहे.

पीएम- कुसुम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमीन क्षेत्रानुसार व इतर पात्रतेच्या अटीनुसार ३, ५ व ७.५ HP DC क्षमतेचे पारेषण विरहित सौर कृषिपंप आस्थापित करण्यात येतात. त्याबाबत लाभार्थी हिस्सा खालीलप्रमाणे आहे:- यासाठी महाऊर्जाच्या खालील संकेतस्थळावर भेट देऊन योजने अंतर्गत अर्ज सादर करता येईल.

Kusum Solar Yojana

Kusum Solar Yojana | ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

तरी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना महाकृषि ऊर्जा अभियान पीएम-कुसुम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महाऊर्जामार्फत करण्यात येत आहे. महाऊर्जामार्फत जिल्हानिहाय उपलब्ध करून दिलेल्या कोटानुसार अर्ज प्राप्त झाल्यानंतर पोर्टल बंद करण्यात येईल. योजनेबाबतची सर्व माहिती व पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याबाबत सर्व माहिती महाऊर्जा www.mahaurja.com संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी महाऊर्जाच्या संकेतस्थळावरून अर्ज करावा व इतर कुठल्याही बनावट / फसव्या संकेतस्थळाचा वापर करू नये.

Kusum Solar Yojana Registration 2023 | अशा पद्धतीने करा अर्ज ?

  • वरती दिलेल्या लिंक वर जाऊन प्रथम नोंदणी करावी.
  • नंतर १०० रु चे पेमेंट ऑनलाइन पद्धतीने करून घ्यावे.
  • पेमेंट करूनही वेब साईट बंद पडली असल्यास पुन्हा तीच प्रोसेस करावी पण डबल पेमेंट करण्याची आवश्यकता नाही.
  • नंतर आपली जमिनीची माहिती भरावी आणि सबमिट करावे. 
  • पुढे आपल्या मोबाईल वर एक OTP येईल तो टाकावा.
  • नंतर आपल्याला User name आणि password चा अजून एक मेसेज येईल तो कॉपी करून मेसेज मधील लिंक वर जाऊन टाकावा आणि उर्वरित फोर्म भरावा.
  • त्यामध्ये सात बारा, फोटो, बँकपासबुक, आणि आधार कार्ड अपलोड करून घ्यावे. आणि अर्ज सबमिट करावा 

Kusum Solar Yojana अर्ज ऑनलाईन होत नसल्यास काय करावे ?

  • सर्वर वर लोड असल्यामुळे अर्ज ऑनलाईन होत नाहीत त्यामुळे एकतर उशिरा सायंकाळी अर्ज करावा.
  • अर्ज करताना चांगले नेटवर्क असेल याची काळजी घ्यावी.
  • आपण ज्या ब्राउजर वरून अर्ज करत आहोत ते सोडून दुसऱ्या ब्राउजर वरून अर्ज करण्याचा प्रयत्न करावा.

पंतप्रधान-कुसुम योजनेच्या नावाने फसव्या वेबसाइट्सपासून सावध रहा :

मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे की, पंतप्रधान किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान (प्रधान मंत्री-कुसुम योजना) च्या नावाखाली शेतकऱ्यांकडून सौर पंप अर्ज करण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासह नोंदणी फी आणि पंपाची किंमत शेतकऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने स्वीकारत असल्याचे मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे. तर अश्या अनेक बनावट वेबसाइट पासून सतर्क राहा.

त्यापैकी काही बनावट वेबसाइट्स  .org, .in, .com अशा डोमेन नावांमध्ये नोंदणीकृत आहेत जसे की www.kusumyojanaonline.in.net, www.pmkisankusumyojana.co.in, www.onlinekusamyojana.org.in, www.pmkisankusumyojana.com आणि इतर अशा अनेक वेबसाइट. म्हणूनच पंतप्रधान-कुसुम योजनेसाठी अर्ज करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना फसव्या वेबसाइट्सवर कोणतीही देय रक्कम देऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे. राज्य सरकारच्या विभागांमार्फत प्रधानमंत्री-कुसुम योजना राबविली जात आहे.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा सौर कृषी पंप ऑनलाईन अर्ज सुरु | अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करू शकता अर्ज, लिंक उपलब्ध... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.