Job Insurance | आता नोकरी गेली तरी चिंता करू नका विमा आहे ना !

Job Insurance
advertisement

Job Insurance | आता नोकरी गेली तरी चिंता करू नका विमा आहे ना !

बेरोजगारी लाभ, ज्यांना बेरोजगारी विमा, बेरोजगारी देयके, बेरोजगारीची भरपाई किंवा फक्त बेरोजगारी असेही म्हणतात, हे अधिकृत संस्थांद्वारे बेरोजगार लोकांना दिलेली देयके आहेत. युनायटेड स्टेट्समध्ये, फायदे अनिवार्य सरकारी विमा प्रणालीद्वारे दिले जातात, वैयक्तिक नागरिकांवर कर नाही. अधिकार क्षेत्र आणि व्यक्तीच्या स्थितीवर अवलंबून, त्या रकमा लहान असू शकतात, केवळ मूलभूत गरजा पूर्ण करतात किंवा पूर्वी कमावलेल्या वेतनाच्या प्रमाणात गमावलेल्या वेळेची भरपाई करू शकतात.

जगभरात सध्या मंदी आणि विक्री कमी झाल्याने हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढले जात आहे. द्विटर, मेटा, गुगल, अमेझॉनसह जगातील अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना काढून टाकले. जात आहे. अशा परिस्थितीत तुम्हालाही नोकरीच्या सुरक्षिततेची काळजी असेल. नोकरी गेली तर घर चालवण्यासह कर्जाचा ईएमआय(Loan EMI) भरणे खूप कठीण होते. अशा संकटावर मात करण्यासाठी नोकरी विमा (Job Insurance) खरेदी करू शकता.

Job Insurance काय आहे.

JOB Insurance

विमा कंपन्या(Loan Company) ही पॉलिसी नोकरदार लोकांना देतात. ही पॉलिसी घेतल्यानंतर विमाधारकाने आपली नोकरी गमावल्यास, विमा कंपनी अटींनुसार त्याचे सर्व ईएमआय भरते. मात्र, नोकरी विमा भारतात स्वतंत्र पॉलिसी(Policy) म्हणून उपलब्ध नाही. ही मुख्य पॉलिसीसह रायडर किंवा अँड ऑन कव्हर म्हणून उपलब्ध आहे. ही पॉलिसी घेण्यासाठी अर्जदाराचे उत्पन्न पगाराच्या स्वरूपात असले पाहिजे.

प्रीमियम आणि कव्हरची मुदत

जॉब इन्शुरन्स पॉलिसीचा प्रीमियम सामान्यतः एकूण कव्हरेजच्या 3% ते ५% पर्यंत असतो. जर गृहकर्जातर्गत नोकरी विमा पॉलिसी घेतली असेल तर त्याचा कालावधी पाच वर्षांचा असेल. जॉब लॉस इन्शुरन्स अत्यंत मर्यादित पद्धतीने फायदे देते. अनेक कंपन्या निव्वळ उत्पन्नाच्या केवळ ५० टक्केच रक्कम देतात. जॉब इन्शुरन्स अंतर्गत कंपन्या खूप कमी कालावधीसाठी विमा संरक्षण देतात. यामध्ये, आरोग्य विमा पॉलिसीप्रमाणे, प्रतीक्षा कालावधी ३० ते ९० दिवस किंवा जास्तीत जास्त चार महिने असतो. त्याचप्रमाणे पॉलिसीची मुदतदेखील एक ते पाच वर्षांपर्यंत बदलते. इतकंच नाही तर कंपनी योजनेंतर्गत तुमचे तीन ते चार ईएमआय भरते, त्याआधी तुम्हाला स्वतःसाठी नवीन नोकरी शोधावी लागते.

Job Insurance घेण्यापूर्वी हे करा.

  • पॉलिसीच्या अटींनुसार नोकरी गमावल्यास १ विमाधारकाला आर्थिक मदत मिळते. मा कंपनी विशिष्ट कालावधीसाठी ईएमआय भरते. जॉब लॉस इन्शुरन्स कव्हरच्या अटी आणि शर्ती वेगवेगळ्या असतात.
  • फसवणूक, भ्रष्टाचार किया इतर गैरकृत्यांमुळे नोकरी गेली तर त्याचा लाभ मिळत नाही.
  • प्रोबेशन कालावधीदरम्यान नोकरी गेली तर विमा संरक्षण मिळत नाही. हे विमा संरक्षण तात्पुरते किवा कराराखाली काम करणाऱ्या लोकाना दिले जात नाही.
advertisement

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा Job Insurance | आता नोकरी गेली तरी चिंता करू नका विमा आहे ना ! या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

आपल्याला विविध प्रकारच्या फॉर्म आणि त्यांची माहिती पाहिजे असल्यास आपण आपल्या जवळच्या सुरेटा नोकरी मदत केंद्र (center.surreta.com) मध्ये सुद्धा भेट देऊ शकता, आपल्याला सुरेटा नोकरी मदत केंद्र मध्ये सर्व प्रकारचे ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्जाच्या प्रिंट मिळतील तसेच कोणतेही माहितीपत्रक प्रिंट करण्याची सोय उपलब्ध तसेच सरकारी योजना आणि शालेय / कॉलेज आणि शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे आपले हक्काचे ठिकाण आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र नक्कीच एकदा भेट द्या. तसेच नवीन नवीन नोकरीचे अपडेट साठी आपण (naukri.surreta.com) वर सुद्धा भेट देऊ शकता किंवा मोबाईल अँप डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करावे Surreta Naukri