या योजनेत शेतकऱ्यांना मिळणार 2 लाख रुपये | अशा पद्धतीने करा अर्ज; GR उपलब्ध...

Gopinath Munde Yojana

Gopinath Munde Yojana | गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात, विशेषतः पाण्यात बुडून मृत्यू होणे, कीटकनाशके हाताळतांना अथवा अन्य कारणामुळे होणारी विषबाधा, विजेचा धक्का बसल्याने किंवा वीज पडणे, उंचावरुन पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचूदंश, नक्षलवाद्यांकडून होणारी हत्या, जनावरांनी खाल्ल्यामुळे अथवा त्यांच्या चावण्यामुळे जखमी किंवा होणारे मृत्यू, दंगल, अन्य कोणतेही अपघात यामुळे मृत्यु झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते, अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांस / त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरीता शासनाकडून रु. २ लाख पर्यंत लाभ देण्यात येतो. सदर सुधारित योजने अंतर्गत अपघातग्रस्त शेतकऱ्यांस व त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्याच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही १ सदस्य (आई-वडील शेतकऱ्याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे एकुण २ जणांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यास संदर्भ क्र. (१) येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. सदर योजना दि. ९ डिसेंबर, २०१९ पासून राबविण्यात येत आहे.

Gopinath Munde Yojana

Gopinath Munde Yojana | GR वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेबाबत आता पावेतोचा अनुभव विचारात घेता विमा कंपनी, विमा सल्लागार कंपनी यांचेद्वारे योजना अंमलबजावणीत विमा कंपनी कडून वेळेत दावे मंजूर न होणे, अनावश्यक त्रुटी काढुन विमा प्रकरणे नाकारणे इत्यादी बाबी निदर्शनास आल्या असून शासन स्तरावरून योग्य पाठपुरवठा करूनही विमा कंपनीच्या कार्यपद्धतीत सुधारणा होताना दिसून येते नसल्यामुळे विमा संरक्षित रक्कम वारसदारांना वेळेत न मिळाल्यामुळे योजनेचा हेतू सफल होत नाही.

तसेच शासनाबाबत शेतक-यांचा रोष ओढवतो. या अनुषंगाने प्रचलित गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये सुधारणा करुन "गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना" राबविण्याबाबत दि. १७.०३.२०२३ रोजी मा. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे. त्यास अनुलक्षून शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

Gopinath Munde Yojana | शासन निर्णय :

शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे, इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच, अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात, यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढावतो किंवा काहींना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तिस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडवणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांस / त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही १ सदस्य (आई-वडील, शेतकऱ्याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे १० ते ७५ वर्ष वयोगटातील एकुण २ जणांकरीता "गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना" राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे.

सदर योजनेच्या प्रयोजनार्थ कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले १ सदस्यांमध्ये आई-वडील, शेतकऱ्याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी यांचा समावेश ग्राह्य धरण्यात येईल. कृषि गणनेनुसार निर्धारित केलेल्या वहितीधारक खातेदार शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही १ सदस्य असे एकुण २ जणांकरीता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत खालील लाभ अनुज्ञेय असतील:-

अ.क्र. अपघाताची बाब  आर्थिक साहाय्य
अपघाती मृत्यू रुपये 2,00,000/-
अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी होणे रुपये 2,00,000/-
अपघातामुळे एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी होणे रुपये 2,00,000/-
अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी होणे रुपये 1,00,000/-

सदर योजनेसाठी लागणारी कागदपत्रे :

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत लाभ प्राप्त होणेसाठी अर्जासोबत खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे :-

  • ७/१२ उतारा
  • मृत्यूचा दाखला
  • शेतकऱ्यांचे वारस म्हणून गावकामगार तलाठ्याकडील गांव नमुना नं. ६ क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद...
  • शेतक-याच्या वयाच्या पडताळणी करीता शाळा सोडल्याचा दाखला / आधारकार्ड / निवडणूक ओळखपत्र, ज्या कागदपत्रा आधारे ओळख / वयाची खात्री होईल असे कोणतेही कागदपत्रे.
  • प्रथम माहिती अहवाल / स्थळ पंचनामा / पोलीस पाटील माहिती अहवाल
  • अपघाताच्या स्वरुपानुसार अंतिम विमा प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा या योजनेत शेतकऱ्यांना मिळणार 2 लाख रुपये | अशा पद्धतीने करा अर्ज; GR उपलब्ध... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.