अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश...
Eknath Shinde Big News : बुलढाणा, यवतमाळ आणि जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून तातडीने शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातील नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
Eknath Shinde Big News : बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव जामोद आणि यवतमाळ, नांदेडसह अनेक जिल्ह्यांत काल झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचा तातडीने पंचनामा करून शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.
Eknath Shinde Big News : पोलीस पाटील पदासाठी नवीन भरती सुरु, फक्त दहावी पास उमेदवार सुद्धा
Eknath Shinde Big News : मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव आणि मदत व पुनर्वसन विभाग तसेच अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या विभागाचे विभागीय आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकारी यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली. बाधित भागातील ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून, स्थानिक ग्रामस्थांच्या घरांच्या झालेल्या नुकसानीचा अहवाल देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
अतिवृष्टीमुळे पूर आलेल्या गावांमध्ये ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे, ग्रामस्थांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात याव्यात, तसेच आपत्तीच्या काळात दक्ष राहण्याच्या सूचनाही जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
हे सुध्दा वाचा