Crop Insurance | पावसामुळे पिकाच्या नुकसानीची भरपाई देणार का सरकार ?

Crop Insurance

Crop Insurance | राज्यात जून ते ऑगस्ट या महिन्यात झालेल्या पूर परिस्थिती आणि अतिवृष्टी मुळे ज्या शेतकऱ्यांची नुकसान झालेले होते, अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने ३३४५ कोटी रुपये इतका निधी हा मंजूर केलेला आहे. त्यामुळे आता लवकरच महाराष्ट्र राज्यातील सर्वच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हा निधी वितरित करण्यात येणार आहे. या वेळेस उपविभागीय अधिकारी तपासणार सर्व शेतकऱ्यांच्या याद्या

पावसामुळे पीकनुकसानीच्या भरपाईची शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार का सरकार देणार लवकर भरपाई ? सुरुवातीला पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पावसाने झाकले आहे. जुलै महिन्यानंतरही जिल्ह्यात पावसाचा प्रकोप कायम होता. त्यातच पावसामुळे फळभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ०४ लाख ९२ हजार २७८.३६ हेक्टर क्षेत्रावर सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे आतापर्यंत ०३ लाख ६९ हजार ६८० शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

जिल्हा प्रशासनाकडून या नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविल्यानंतर राज्य शासनाकडून ता.१७ नोव्हेंबर रोजी पिकांच्या नुकसानीची मदत जाहीर केली आहे. यात जिल्ह्याच्या खरीप पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या वाट्याला एकूण ३९७ कोटी ७३ लाख १४ हजारांची निधी मिळणार आहे.

Crop Insurance | पावसामुळे पिकाच्या नुकसानीची भरपाई देणार का सरकार ?

Crop Insurance

हा निधी जाहीर करताना शासनाकडून जिरायती पिकांसाठी तीन हेक्टरपर्यंत प्रति हेक्टर १३ हजार ६०० रुपये, बागायती पिकासाठी तीन हेक्टरपर्यंत प्रति हेक्टर २७ हजार तर फळपिकांसाठी तीन हेक्टरपर्यंत प्रति हेक्टर ३६ हजारांची मदत जाहीर केली आहे.

मात्र, मदत जाहीर करून ही पाच ते सहा दिवस झाले आहेत. त्यानंतर अद्याप जिल्ह्यात अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईचा निधी अद्यापि आलेला नाही.

परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेले सोयाबीन, कपाशी पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात शासनाकडून ही मदतीला उशीर होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता आदेश निघाले आहे, मदत कधी येणार याचीच शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.

उपविभागीय अधिकारी तपासणार याद्या

परतीच्या अतिवृष्टीने ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार झालेल्या आहेत. मात्र, या याद्या तयार करताना त्या व्यवस्थित झाल्या आहेत काय, त्यात काही त्रुटी आहे काय, यादीतील शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे काय, क्षेत्र बरोबर आहे काय या बाबी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत तपासण्यात येणार आहेत. यासंदर्भात सोमवारी आदेश दिले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी दिली.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा Crop Insurance | पावसामुळे पिकाच्या नुकसानीची भरपाई देणार का सरकार ? या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

आपल्याला विविध प्रकारच्या फॉर्म आणि त्यांची माहिती पाहिजे असल्यास आपण आपल्या जवळच्या सुरेटा नोकरी मदत केंद्र (center.surreta.com) मध्ये सुद्धा भेट देऊ शकता, आपल्याला सुरेटा नोकरी मदत केंद्र मध्ये सर्व प्रकारचे ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्जाच्या प्रिंट मिळतील तसेच कोणतेही माहितीपत्रक प्रिंट करण्याची सोय उपलब्ध तसेच सरकारी योजना आणि शालेय / कॉलेज आणि शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे आपले हक्काचे ठिकाण आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र नक्कीच एकदा भेट द्या. तसेच नवीन नवीन नोकरीचे अपडेट साठी आपण (naukri.surreta.com) वर सुद्धा भेट देऊ शकता किंवा मोबाईल अँप डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करावे Surreta Naukri