Caste Validity | जात वैधता प्रमाणपत्र आता मिळणार तुरंत मंडणगड पॅटर्न ची अंमलबजावणी सुरू

Caste Validity

Caste Validity | पासपोर्टच्या धर्तीवर आता ''जात वैधता प्रमाणपत्र' (Caste Validity Certificate) देणारा अहमदनगर हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर अहमदनगर मध्ये पहिला प्रयोग यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे या मध्ये मंडणगड पॅटर्नची अंमलबजावणी करण्याची सुरुवात केली आहे.

अहमदनगर, मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी यांनी दि. १९ नोव्हेंबर रोजी अहमदनगर येथील सामाजिक न्याय भवन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी दूरचित्रवाणीद्वारे बोलताना "पासपोर्टच्या धर्तीवर 'जात वैधता प्रमाणपत्र' (Caste Validity Certificate) दिली जातील" अशी घोषणा केली. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेने अहमदनगर जिल्ह्यात खऱ्या अर्थाने फळ मिळाले आहे. अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी (Caste Validity) समिती पासपोर्टच्या धर्तीवर कागदपत्रांची जागेवर पडताळणी करून 'जात वैधता प्रमाणपत्र' (Caste Validity Certificate) देणारा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.

Caste Validity | पासपोर्टच्या धर्तीवर आता ''जात वैधता प्रमाणपत्र' मिळणार

Caste Validityपद्मश्री विखे-पाटील महाविद्यालय, लोणी, तालुका राहता आणि जिजामाता माध्यमिक तांत्रिक व उच्च माध्यमिक विद्यालय, भेंडा, तालुका नेवासा येथे अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जातवैधता प्रमाणपत्र वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात लोणी येथे ९७ विद्यार्थ्यांचे प्रस्ताव स्वीकारून ९२ विद्यार्थ्यांचे तर भेंडा येथे ११६ विद्यार्थांचे प्रस्ताव स्वीकारून १०९ विद्यार्थ्यांना जागेवरच जात वैधता प्रमाणपत्रे देण्यात आली, जात पडताळणी समितीच्या धडाडीच्या  कामामुळे महाविद्यालयातच जातपडताळणी प्रमाणपत्र वितरणाची ‘मंडणगड पद्धत’ राबविण्यास सुरुवात झाली आहे.

लोणी व भेंडा येथे आयोजित एकदिवसीय शिबिराच्या अध्यक्षस्थानी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) विकास पानसरे होते. सदस्य तथा उपायुक्त अमिना शेख, सदस्य सचिव व संशोधन अधिकारी भागवत खरे, महाविद्यालयाचे प्राचार्य भरत वाबळे उपस्थित होते. या दोन्ही शिबिरात ५६५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

हेही वाचा : जात वैधता प्रमाणपत्रसाठी लागणारे दस्तावेज

अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने कमी वेळेत प्रकरणे निकाली काढण्यासाठी केलेल्या कामाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले. सेवा पखवाड्यात अहमदनगर जिल्ह्याने राज्यात सर्वाधिक जात ओळखपत्रांचे वाटप केले आहे. यापुढे या समितीने असेच उत्कृष्ट कार्य करत राहावे. येत्या काळात पासपोर्टच्या धर्तीवर 'जात वैधता प्रमाणपत्र' (Caste Validity Certificate) दिले जाणार आहे. अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. राज्यात प्रथमच मुख्यमंत्र्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने केले आहे.

हेही वाचा : कोणत्या जातीचे निघते जात वैधता प्रमाणपत्र

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) विकास पानसरे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या घोषणेची आणि 'मंडणगड पॅटर्न'ची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा समितीने विद्यार्थ्यांना थेट जात प्रमाणपत्र पडताळणीचे वाटप केले आहे. असे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे जिल्ह्यातील अधिक महाविद्यालयांमध्ये शिबिरांच्या माध्यमातून इयत्ता ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना 'जात वैधता प्रमाणपत्र' (Caste Validity Certificate) वाटप करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मदत केली जाणार आहे.

अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट : लिंक 

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा Caste Validity | जात वैधता प्रमाणपत्र आता मिळणार तुरंत मंडणगड पॅटर्न ची अंमलबजावणी सुरू या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

आपल्याला विविध प्रकारच्या फॉर्म आणि त्यांची माहिती पाहिजे असल्यास आपण आपल्या जवळच्या सुरेटा नोकरी मदत केंद्र (center.surreta.com) मध्ये सुद्धा भेट देऊ शकता, आपल्याला सुरेटा नोकरी मदत केंद्र मध्ये सर्व प्रकारचे ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्जाच्या प्रिंट मिळतील तसेच कोणतेही माहितीपत्रक प्रिंट करण्याची सोय उपलब्ध तसेच सरकारी योजना आणि शालेय / कॉलेज आणि शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे आपले हक्काचे ठिकाण आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र नक्कीच एकदा भेट द्या. तसेच नवीन नवीन नोकरीचे अपडेट साठी आपण (naukri.surreta.com) वर सुद्धा भेट देऊ शकता किंवा मोबाईल अँप डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करावे Surreta Naukri