Aadhar Verification | १७५ कोटी वेळा झाले आधार व्हेरिफिकेशन

Aadhar Verification
advertisement

Aadhar Verification | १७५ कोटी वेळा झाले 'आधार' व्हेरिफिकेशन

देशात आधार कार्डच्या वापरात जबरदस्त वाढ होताना दिसत आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये आधार कार्डद्वारे १७५.४४ कोटी पडताळणी व्यवहार ऑथेन्टिकेशन ट्रॅन्ड्रॉक्शन झाले. यातील बहुतांश पडताळणी व्यवहार बोटांच्या ठशांद्वारे पूर्ण करण्यात आले आहेत. त्याखालोखाल डेमोग्राफिक व ओटीपी आधारित पडताळणीचा प्रक्रियेचा वापर करण्यातआला. आधार कार्ड भारताच्या 'डिजिटल इंडिया'(Digital India) पुढाकारात महत्त्वाची भूमिका पार पाडताना दिसत आहे.

८,४२६ कोटी ऑक्टोबर अखेरपर्यंत पाणी पडताळणी व्यवहार आधारच्या १२ अंकी डिजिटल आयडीचा उपयोग करून केले. यात हयात प्रमाणपत्र, ई-केवायसी, दूरवर्ती क्षेत्रातील बँकिंग व्यवहार आणि आधाराधिष्ठित डीबीटी अथवा पडताळणी यांचा समावेश आहे.

Aadhar Verification | १७५ कोटी वेळा झाले आधार व्हेरिफिकेशन

Aadhar Verification

ग्राहक आणि व्यापाऱ्यांनाही लाभ

आधारचा उपयोग करून २३.५६ कोटी ई-केवाईसी व्यवहार ऑक्टोबरमध्ये झाले. ऑक्टोबर २०२२ पर्यंत ई-केवायसीची एकूण संख्या १.३२१.४९ कोटी झाली आहे. आधारद्वारे होणाया ई-केवायसीमुळे बँकिंग व बिगर- बैंकिंग वित्तीय सेवा अधिक पारदर्शक तसेच अधिक सुलभ झाल्या आहेत. ग्राहक आणि व्यापारी अशा दोघांनाही त्याचा लाभ होत आहे. आधारधारकाच्या संमतीनंतरच ई-केवायसी केले जाते. यात कागदोपत्री कारवाई पूर्णतः समाप्त झाली आहे.

२३.६४ कोटी एईपीएस आधारित व्यवहार

आधार सक्षम देय प्रणालीलाही (एईपीएस) ऑक्टोबरमध्ये गती मिळाली आहे. आधारच्या माध्यमातून दुर्बल घटक श्रेणीतील नागरिक १.१०० पेक्षा अधिक शासकीय योजनांचा लाभ घेत आहेत. ऑक्टोबरमध्ये २३.६४ कोटी एईपीएस आधारित व्यवहार झाले. सप्टेंबरच्या तुलनेत हा आकडा १२.४ टक्के अधिक आहे, ऑक्टोबर २०२२ च्या अखेरपर्यंत एईपीएस आणि मायक्रो-एटीएम नेटवर्कच्या माध्यमातून दूरवर्ती भागात १,५७३.४८ कोटी बँकिंग व्यवहार करण्यात आले आहेत.

आधार पडताळणी म्हणजे काय?

"आधार ऑथेंटिकेशन" ही प्रक्रिया आहे ज्याद्वारे एखाद्या व्यक्तीचा आधार क्रमांक आणि लोकसंख्याशास्त्रीय माहिती (जसे की नाव, जन्मतारीख, लिंग इ.) किंवा बायोमेट्रिक माहिती (फिंगरप्रिंट किंवा बुबुळ) केंद्रीय ओळख डेटा भांडार (CIDR) मध्ये सबमिट केली जाते. त्याच्या पडताळणीसाठी आणि UIDAI आहे.

आधार कागदपत्रांची पडताळणी कोण करते?

जेव्हा रहिवासी नावनोंदणी केंद्रावर आधारसाठी नावनोंदणी करण्यासाठी येतो तेव्हा रहिवाशाने प्रदान केलेल्या दस्तऐवजांमधून लोकसंख्याशास्त्रीय माहिती घेतली जाईल. रहिवाशाने सादर केलेल्या कागदपत्रांचे प्रमाणीकरण कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी अधिकृत अधिकार्‍यांकडून रीतसर पडताळणी केली जाते. अशा अधिकाऱ्यांना पडताळणी करणारे म्हणतात.

 

advertisement

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा Aadhar Verification | १७५ कोटी वेळा झाले आधार व्हेरिफिकेशन या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

आपल्याला विविध प्रकारच्या फॉर्म आणि त्यांची माहिती पाहिजे असल्यास आपण आपल्या जवळच्या सुरेटा नोकरी मदत केंद्र (center.surreta.com) मध्ये सुद्धा भेट देऊ शकता, आपल्याला सुरेटा नोकरी मदत केंद्र मध्ये सर्व प्रकारचे ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्जाच्या प्रिंट मिळतील तसेच कोणतेही माहितीपत्रक प्रिंट करण्याची सोय उपलब्ध तसेच सरकारी योजना आणि शालेय / कॉलेज आणि शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे आपले हक्काचे ठिकाण आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र नक्कीच एकदा भेट द्या. तसेच नवीन नवीन नोकरीचे अपडेट साठी आपण (naukri.surreta.com) वर सुद्धा भेट देऊ शकता किंवा मोबाईल अँप डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करावे Surreta Naukri