Aadhar Update | हे करा नाहीतर आधार कार्ड होणार निष्क्रिय

Aadhar Update | आधार क्रमांक हा प्राधिकरणाने विहित केलेली पडताळणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर UIDAI (“अधिकारी”) द्वारे भारतातील रहिवाशांना जारी केलेला 12-अंकी यादृच्छिक क्रमांक आहे. भारतातील रहिवासी असलेली कोणतीही व्यक्ती, वय आणि लिंग काहीही असो, आधार क्रमांक मिळवण्यासाठी स्वेच्छेने नावनोंदणी करू शकते. नावनोंदणी करू इच्छिणाऱ्या व्यक्तीने नावनोंदणी प्रक्रियेदरम्यान किमान लोकसंख्याशास्त्रीय आणि बायोमेट्रिक माहिती प्रदान करणे आवश्यक आहे जे पूर्णपणे विनामूल्य आहे. एखाद्या व्यक्तीने फक्त एकदाच आधारसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे आणि डी-डुप्लिकेशन नंतर फक्त एकच आधार तयार केला जाईल, कारण लोकसंख्याशास्त्रीय आणि बायोमेट्रिक डी-डुप्लिकेशन प्रक्रियेद्वारे विशिष्टता प्राप्त केली जाते.
- 'आधार'ला दहा वर्षे झाली; अपटेड केले का ?
- १० वर्षांनंतर आधार अपडेट करणे आवश्यक
- बोटांचे ठसे, पत्ता अद्ययावतीकरण गरजेचे
- आधार अपडेट कोठे कराल?
- कागदपत्रे काय आवश्यक ?
- पहिल्यांदाच आधार काढताय ?
- मुलांचे आधार अपडेट कधी कराल?
- तर होऊ शकते आधार कार्ड निष्क्रिय
Aadhar Update | लवकर करा आधार कार्ड अपडेट नाहीतर आधार कार्ड होणार निष्क्रिय
'आधार'ला दहा वर्षे झाली; अपटेड केले का ?
देशातील प्रत्येक नागरिकाला केंद्र सरकारकडून विशिष्ट सांकेतिक क्रमांक असलेले आधार कार्ड दिले जाते. प्रत्येक नागरिकांना शासकीय कामासाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे. केंद्र शासनाकडून दिले जाणारे हे आधार कार्ड प्रत्येक दहा वर्षांनंतर अपडेट करण्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे बनावट आधार कार्डद्वारे फसवूणक होणार नाही. तसेच जनतेची माहितीही सुरक्षित राहणार आहे.
१० वर्षांनंतर आधार अपडेट करणे आवश्यक
नागरिकांच्या आधार कार्डचा गैरवापर होऊ नये, तसेच त्यांची माहिती सुरक्षित राहावी, यासाठी दहा वर्षांनंतर आधार अपडेट करणे आवश्यक आहे.
बोटांचे ठसे, पत्ता अद्ययावतीकरण गरजेचे
शासकीय, बैंक सेवेसाठी अनेकदा बोटाचे ठसे घेतले जातात. त्यामुळे आधार अपडेट करताना बोटांचे ठसे त्याबरोबरच पत्ताही अपडेट करणे गरजे आहे.
आधार अपडेट करण्यासाठी आधार सेवा केंद्राची व्यवस्था आहे. नागरिक शासनाच्या खालील अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अपडेट करू शकतात.
आधार कार्ड अपडेट सेंटरवर आधार अपडेट करण्यासठी जुने आधार कार्ड असणे गरजेचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अपडेट करण्यासाठी आधार नंबर गरजेचा आहे.
पहिल्यांदा आधार कार्ड काढण्यासाठी आधार सेंटरवर शाळेचा दाखला, मतदान कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र ही कागदपत्रे आवश्यक आहेत.
५ वर्षांनंतर मुलाचे बायोमेट्रिक पडताळणी करणे आवश्यक आहे. अन्यथा, मुलाचे आधार कार्ड निष्क्रिय होते. या नियमाशी संबंधित सर्व माहिती आणि ५ वर्षानंतर मुलाच्या बोटांचे ठसे, डोळे, स्कैन करून आधार अपडेट केले जाते.
तर होऊ शकते आधार कार्ड निष्क्रिय
प्रत्येक व्यक्तीने दहा वर्षांत आपले आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे आहे. तसेच REPLY आधार कार्ड हे पाच वर्षांनंतर अपडेट करणे बंधनकारक आहे. असे न केल्यास मुलांचे आधार कार्ड निष्क्रिय होऊ शकते.
आपल्याला विविध प्रकारच्या फॉर्म आणि त्यांची माहिती पाहिजे असल्यास आपण आपल्या जवळच्या सुरेटा नोकरी मदत केंद्र (center.surreta.com) मध्ये सुद्धा भेट देऊ शकता, आपल्याला सुरेटा नोकरी मदत केंद्र मध्ये सर्व प्रकारचे ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्जाच्या प्रिंट मिळतील तसेच कोणतेही माहितीपत्रक प्रिंट करण्याची सोय उपलब्ध तसेच सरकारी योजना आणि शालेय / कॉलेज आणि शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे आपले हक्काचे ठिकाण आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र नक्कीच एकदा भेट द्या. तसेच नवीन नवीन नोकरीचे अपडेट साठी आपण (naukri.surreta.com) वर सुद्धा भेट देऊ शकता किंवा मोबाईल अँप डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करावे Surreta Naukri
हे सुध्दा वाचा